ग्रॅंटरोड ते पूर्व मूक्त मार्ग केवळ सहा मिनिटांत पोहचता येणार, ही आहे योजना

मुंबईकरांना लवकर साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा एलीवेटेड पूल मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फूटणार आहे.

ग्रॅंटरोड ते पूर्व मूक्त मार्ग केवळ सहा मिनिटांत पोहचता येणार, ही आहे योजना
ELEVATEDImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:55 AM

मुंबई : सध्या ग्रॅंटरोड स्टेशन ते इस्टर्न फ्रि वे या अंतरासाठी वाहनाने जायला अर्धा तास ते पन्नास मिनिटे लागतात. परंतू या ठिकाणी ग्रॅंटरोड स्टेशन ते पूर्व मुक्त मार्ग असा 5.56 किमीचा एलिवेटेड पूल बांधण्याची पालिकेची महत्वाकांक्षी योजना आहे. या मार्गासाठी नुकत्याच निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या निविदा मंजूर झाल्यास 42  महिन्यांत (पावसाळ्यासह) हा उन्नत मार्ग पूर्ण होणार असून दक्षिण मुंबईच्या पी.डीमेल्लो मार्गावरील कोंडी या मार्गामुळे कमी होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सातत्याने विविधस्तरिय प्रयत्न अविरतपणे करण्यात येत असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लवकरच तब्बल 5.56  किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 5 हजार 560 मीटर लांबीचा हा पूल बांधण्यासाठी 662.42 कोटी (जीएसटी सह) इतका अंदाजित खर्च येणार आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान होणार

हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी या उन्नत मार्गामुळे केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील. या उन्नत मार्गामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

या भागातील नागरिकांना दिलासा

पूर्व मुक्तमार्गास जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होवून दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणा-या वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.