ठरले तर, पंतप्रधान एकाच वेळी सीएसएमटीत दोन ‘वंदेभारत’ना हीरवा झेंडा दाखवतील, महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची संख्या चार झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला एकाच वेळी दोन वंदेभारत एक्सप्रेस गाड्यांची भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या दोन वंदेभारत एक्सप्रेसना ते हिरवा झेंडा दाखवतील.

ठरले तर, पंतप्रधान एकाच वेळी सीएसएमटीत दोन 'वंदेभारत'ना हीरवा झेंडा दाखवतील, महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची संख्या चार झाली
vandebharatImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 2:13 PM

मुंबई : महाराष्ट्राला आणखी दोन वंदेभारतची ( Vande Bharat  ) अनोखी भेट मिळाली आहे. मुंबई ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन येत्या दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NarendraModi ) यांच्या हस्ते होत आहे. या दोन गाड्यांमुळे मध्य रेल्वेला मिळालेल्या वंदेभारतची संख्या आता तीन झाली आहे. तर महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारतची गाड्यांची संख्या चार झाली आहे. काय आहे या दर ताशी 180 किमीच्या वेगाने धावणाऱ्या वंदेभारत गाड्याची योजना आणि रचना पाहूया

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम रेल्वे बोर्डाकडून आला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ठ केले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSTM) येथून सीएसएमटी-सोलापूर आणि सीएसएमटी-साई नगर शिर्डी या दोनवंदेभारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील शिर्डी आणि पंढरपूर या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. यामुळे चार आंतरराज्यीय वंदेभारत गाड्या असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुंबईतून पहीली वंदेभारत मुंबई सेंट्रल ते गांधीनगरपर्यंत धावली होती. ही गाडी पश्चिम रेल्वेला मिळाली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते बिलासपूर  वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चे उद्गाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आता मुंबई ते सोलापूर आणि शिर्डी वंदेभारतला ते हिरवा झेंडा दाखवतील. देशात एकूण आठ वंदे भारत सध्या धावत आहेत.

बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी-मरोळ येथील बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अल जामिया येथील तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे. मोदी यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बोहरा कॉलनी परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

6 फेब्रुवारीला बंगळुरू येथे ऊर्जासप्ताहाचे उद्घाटन 

पंतप्रधान मोदी ६ फेब्रुवारी रोजी भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील आणि कर्नाटकातील बंगळुरू आणि तुमाकुरू येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. कर्नाटक माहिती विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान ६ फेब्रुवारी रोजी सकाळी मडावरा जवळील बंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.