मुंबईः खासदार राहुल शेवाळे यांच्यावरच्या आरोप प्रकरणात आता दाऊद इब्राहिमची एन्ट्री झाली आहे. मला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचं थेट दाऊदशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप शेवाळे यांनी केला आहे. त्यावर संबंधित महिलेनं काय म्हटलं आहे आणि राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत अजून काय नवे दावे केले आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावरच्या आरोपांच्या प्रकरणाला असंख्य फाटे फुटले आहेत.
ज्या महिलेने शेवाळे यांच्यावर लग्नाच्या आमिषानं अत्याचाराचा आरोप केला आहे, ती महिला थेट दाऊद गँगशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप शेवाळे यांनी केला आहे.
या प्रकरणात राहुल शेवाळे यांनी ज्या महिलेवर आरोप केले आहेत, त्या महिलेचं म्हणणं आहे की शेवाळेंनी लग्नाच्या आमिषानं आपल्यावर अत्याचार केला आहे.
तर शेवाळे यांचा दावा आहे की कोरोनाकाळात एका मित्राच्या सांगण्यावरुन मी महिलेला मदत केली होती, तेव्हापासून त्या महिलेनं आपल्याला ब्लॅकमेलिंग सुरु केलं असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.
या प्रकरणातील महिला म्हणते की राहुल शेवाळे यांनी तिची फसवणू केली आहे. तर खासदार शेवाळे म्हणतात की, संबंधित महिलेनं खोटे व्हिडीओ आणि फोटो फिरवले आहेत. ज्याबद्दल तिला दुबईमध्येही शिक्षा झाली आहे.
संबंधित महिलेमागे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट ठाकरे यांच्या शिवसेनेचं पाठबळ असल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे या
संपूर्ण प्रकरणाची एनआयए चौकशीची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
आणि यामध्ये दाऊद कनेक्शन असल्यामुळे राष्ट्रवादीकडूनही पाठराखण करणाऱ्यांचीही चौकशीची करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. अत्याचाराचे आरोप, त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा दावा आणि आता या प्रकरणात थेट दाऊन कनेक्शनचा आरोप झाल्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.