अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र होणार काय?, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितली प्रक्रिया कशी असते

अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या मंत्रीमंडळात सहभागी झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका अजित पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक धोरणाच्या संदर्भात राज्याच्या जनतेला सूचना करायची होती.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र होणार काय?, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितली प्रक्रिया कशी असते
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 6:04 PM

मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ मंत्री काल शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हंटलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका सादर केली. यासंदर्भात बोलताना अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांविरोधात जयंत पाटील यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेबाबत शिफारस केली आहे. आमदारांच्या अपात्रतेवर माझं मत आहे की, कुठल्याही व्यक्तीच्या अपात्रतेच्या कारवाई ही पक्षाद्वारे होऊ शकत नाही. तो अधिकार स्पीकरकडे राहते. त्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जात नाही.

अनिल पाटील हे प्रदोत

त्यानंतर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार यांना आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केला आहे. अजित पवार हे विधिमंडळाची जबाबदारी सांभाळतील. प्रदोत यांची नियुक्ती पक्ष करत असते. अनिल पाटील हे प्रदोत आधी होते. ते कायम राहणार आहेत. संघटनात्मक बाबतीत आवश्यक त्या सूचना, नियुक्त्या करायच्या होत्या. त्या जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या मंत्रीमंडळात सहभागी झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका अजित पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक धोरणाच्या संदर्भात राज्याच्या जनतेला सूचना करायची होती. संघटनात्मक दृष्टीने आम्ही मोठ्या प्रमाणात नियुक्त्या करण्यास सुरवात केली.

जयंत पाटील जबाबदारीतून मुक्त

२१ जूनच्या कार्यक्रमात पक्षाने अधिकृतपणे मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी दिली होती. त्यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालो होता. राज्यात जयंत पाटील हे यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आता जयंत पाटील यांना अधिकृत कळवलं की, त्यांना जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागेवर सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत.

राज्यातील संघटनात्मक बदल सुनील तटकरे करतील

सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना करतो. जयंत पाटील यांनी हँडओव्हरची प्रक्रिया करावी, अशी सूचना केली आहे. राज्यामध्ये जे काही संघटनात्मक बदल करायचे आहेत. प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांना अधिकार राहतील. महिला, युवक अध्यक्ष यांची नियुक्ती सुनील तटकरे करू शकतात, असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.