चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली.

चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?
केंद्रीय गृहमंत्र्यांवर अरविंद सावंतांचा हल्लाबोलImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 3:46 PM

मुंबई : ठाकरे गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठविलं. यासंदर्भात अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं (Election Commission) चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे.

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही.

या पद्धतीनं भाजपचे नेते वागणूक देतील, असं वाटत होतं. देशाचे गृहमंत्री म्हणतात खरी शिवसेना शिंदे गटाची आहे. म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

ते म्हणाले, भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पाच वर्षे काही होणार नाही. सर्व जनतेला कळतंय, हे महत्त्वाचं आहे. शिंदे गटातील लोकं हे शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून गेलेत. हे कठपुतळी बाहुले भाजपच्या इशाऱ्यावर नाचताहेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केला.

निवडणूक आयोग कसं वागतोय. चार तासांत निर्णय देणं. दिलेल्या माहितीची छाननी न घेणं. नोटरीची माहिती न घेणं, यावरून निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर निर्णय देतो, हे समजतं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेत. विश्वासघातकी पक्ष म्हणजे भाजप आहे. ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मी सांगणार.

जी पाऊलं पडत होती. ती योग्य नाही. यांनी लोकशाही मानायचीच नाही, असं ठरविलंय. बाबासाहेबांच्या संविधानाकडं दुर्लक्ष केलंय.

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे गुलाम झाले आहेत. हे जगाला कळलं आहे. निवडणूक आयोग ही न्यायिक संस्था आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून निर्णय देतात, हे योग्य नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणतात. तेव्हा देशाच्या लोकशाहीवर, घटनेवर घाव घातला जात आहे, हे स्पष्ट आहे, असा घणाघातही सावंत यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.