Video : अन् भरधाव कारने वाहतूक पोलिसालाच 800 मीटर फरपटत नेले, नेमका प्रकार काय?

खारघर पोलीस वाहतूक अंमलदार नामदेव गादेकर हे नेहमीप्रमाणे कोपरा ब्रीज येथे कर्तव्य बजावत होते. या ब्रीजवर विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करीत होते. याच दरम्यान, विरुध्द बाजूने MH-46, BZ 6296 ही होंडाई कंपनीची कार भरधाव वेगात आली होती. त्यामुळे गादेकर यांनी थांबण्याचा प्रयत्न केला.

Video : अन् भरधाव कारने वाहतूक पोलिसालाच 800 मीटर फरपटत नेले, नेमका प्रकार काय?
वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क 800 मिटर ते देखील गाडीच्या बोनेटवर बसवत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 2:35 PM

मुंबई : कर्तव्य बजावणाऱ्या (Traffic Police) वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत ही आपण अनेकवेळा पाहिली असेल. पण (Kharghar Police) खारघरमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या (Action against vehicles) वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क 800 मिटर ते देखील गाडीच्या बोनेटवर बसवत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ कारवाईमुळे वाहनधारकाने हे टोकाचे पाऊल उचलले. या सर्व प्रकाराची मोबाईल शूटींग केल्याने समोर आला आहे. खालघर वाहतूक शाखा परिसरात ही घटना घडली आहे. संबंधितावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नेमकी घटना कशी घडली?

खारघर पोलीस वाहतूक अंमलदार नामदेव गादेकर हे नेहमीप्रमाणे कोपरा ब्रीज येथे कर्तव्य बजावत होते. या ब्रीजवर विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करीत होते. याच दरम्यान, विरुध्द बाजूने MH-46, BZ 6296 ही होंडाई कंपनीची कार भरधाव वेगात आली होती. त्यामुळे गादेकर यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईच्या धास्तीने वाहनचालकाने कार थांबवलीच नाही. डिमार्ट कडे रोड जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणा पर्यंत गाडीच्या बोनेट वर टांगून गादेकर यांना फरपटत नेले.

हे सुद्धा वाचा

पोलीस नाईक यांचे प्रसंगावधान

घडलेला प्रकार निदर्शनास येताच कोपरा ब्रीजच्या बाजूला कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस नाईक निवृती भोईर यांनी रनिंग करून त्या गाडीचा पाठलाग केला. एवढेच नाहीतर त्यासाठी त्यांनी एका कार चालकाची मदत घेऊन त्या संबंधित होंडाई कारला गाडी आडवी घातली. संबंधितावर कारवाईची प्रक्रिया ही सुरु आहे. खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना मोबाईलध्ये कैद

संबंधित होंडाई कार चालकाला पकडण्यासाठी पोलीस नाईक भोईर यांनी ज्यांना मदत मागितली त्या कारमधील डॉ. जान्हवी पाटील यांनी सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. त्यामुळे घटनेतील आरोपी कोण आहे हे लवकरच समोर येईल. पण केवळ कारवाई होईल म्हणून असे टोकाचे पाऊल उचलणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित झाला आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.