Mulund car accident : कारला कट का मारली?, जाब विचारायला गेला आणि जीव गमावून बसला
टेम्पोचालकाने गाडी बाहेर न पडताच गाडी थेट त्यांच्या अंगावर नेली. यात इतरांनी टेम्पो समोरून बाजूला होऊन आपला जीव वाचविला. परंतु भावेश याला टेम्पो समोरून निघता आलं नाही.
मुंबई : भावेश सोनी हा युवक त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून (Mumbai Crime) ठाण्याच्या (Thane) दिशेने कारने प्रवास करत होता. मुलुंड टोल नाक्याच्या आधी पूर्व ध्रुतगदी मार्गावर त्याला एका टेम्पोने कट मारली. टोल नाका क्रॉस केल्यावर भावेश आणि त्याच्या नातेवाईकांनी टेम्पोला अडविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी टेम्पोला (The tempo driver) ओव्हरटेक करून सर्वजण टेम्पो समोर उभे राहिले. टेम्पोचालकाला बाहेर येण्यास सांगितले. परंतु टेम्पोचालकाने गाडी बाहेर न पडताच गाडी थेट त्यांच्या अंगावर नेली. यात इतरांनी टेम्पो समोरून बाजूला होऊन आपला जीव वाचविला. परंतु भावेश याला टेम्पो समोरून निघता आलं नाही आणि टेम्पोने त्याला वीस फूट फरपटत नेले.
युवकाला टेम्पोने उडवले
कारला कट का मारली याचा जाब विचारण्यासाठी टेम्पो अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला टेम्पोने उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. भावेश याला ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले. परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.
टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल
नवघर पोलिसांनी टेम्पोचालक नूर मोहम्मद इब्रार अली शाह याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कलम 302 आणि मोटर वाहन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुलुंडमध्ये घडली. कारला कट का मारली याचा जाब विचारण्यासाठी टेम्पो अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला टेम्पोने उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे.
नातेवाईकांनी वाचवला जीव
टेम्पोचालकाने जाणूनबुजून कारला उडवले. याचा अर्थ तो किती निर्ढावला असेल, याची कल्पना येते. अशा निर्धावलेल्या चालकाला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कारचालकाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. त्यामुळे कारचालकाच्या नातेवाईकांच्या अंगावर शहारे आले. कसाबजा जीव वाचवून ते कारमधून निघून गेले. पण, कारचा चालक सापडला आणि जीवाला मुकला.