रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या

मुंबई : मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरीष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने  गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पायल मूळची जळगावची रहिवासी होती. […]

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 1:53 PM

मुंबई : मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरीष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने  गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पायल मूळची जळगावची रहिवासी होती. आदिवासी समाजातील पायल ताडवी एका गरीब घरातून वैद्कीय शिक्षणासाठी मुंबईत आली होती. नुकतेच तिचे लग्नही झाले होते. पण ही सर्व स्वप्न आता एका क्षणात उद्धवस्त झाली आहेत. कारण पायलने नायर रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली.

आदिवासी असणं हा पायलसाठी अभिशाप ठरला. कारण तिला राखीव कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. यामुळे नायर रुग्णालयातील तीन वरीष्ठ डॉक्टरकडून तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. कँटीनमध्ये तिच्यावर कमेंट करणं, व्हाट्सअॅप ग्रुपवर तिला वाईट वाटेल, असे मेसेज करणे, असा प्रकार तीन महिला सिनिअर डॉक्टर्सकडून करण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून पायलने नायर वैदयकीय महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस आणि रुग्णालयाचे तक्रारीकडे दुर्लक्ष

सुमारे तीन वर्षापूर्वी तेलंगणा विद्यापाठात रोहित वेमुला या दलित विदयार्थ्यांनं आत्महत्या केली. कारण तो दलित असल्यानं त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. ज्याप्रमाणे रोहित वेमुलानं पत्र लिहून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती, त्याप्रमाणे पायलनं तिचा होणारा मानसिक छळ आईच्या कानावर घातला होता. पायलच्या आईनं 10 मे रोजी नायर रुग्णालय प्रशासन, आरोग्यमंत्री, आग्रीपाडा पोलिस ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही.

रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार

आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटीबरोबर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तीनही डॉक्टर पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कधी येणार प्रशासनाला जाग?

प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यानं पायलला आपले जीवन संपवावे लागले. त्यामुळे पायलचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी तिचा मृतदेह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले. परंतु तरीही प्रशासनाला जाग न आल्यानं शेवटी नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह घेऊन अर्धा तास रस्ता रोको केला.

रॅगिंगचा कायदा झाला निष्प्रभ ?

नायर रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच पायलच्या आईच्या तक्रारीची दखल घेतली असती तर पायलने असे टोकाचे पाऊल उचलले नसते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आजही असंख्य दलित, आदिवासी विद्यार्थ्यांचे रॅगिंग होतं, मानसिक छळ होतो, पण तो समोर येत ऩाही. अशा प्रकारचे रॅगिंग वेळीच रोखण्याची, कडक पाऊल उचलण्याची गरज आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“वैद्यकीय संचालक आणि डीन यांची समिती बनवून यावर कसा मार्ग काढता येईल याबाबत 15 दिवसात अहवाल मागितले आहेत. तडवी यांचे कुटुंब माझे परिचित आहेत. त्यांनी मला एकदा तरी भेटायला हवं होतं. या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने हाताळत आहोत. मी मुंबईत नसल्याने कुटुंबाची भेट घेऊ शकलो नाही. दिल्लीवरुन आल्यावर दोन दिवसात तडवी कुटुंबाची भेट घेईन”, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.