…तर सरकारमध्ये वितुष्ट निर्माण होईल, शिंदे गटाच्या या आमदाराचा इशारा

स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून शिवसेना फोडली. मग आता स्वाभिमान कुठं गेला.

…तर सरकारमध्ये वितुष्ट निर्माण होईल, शिंदे गटाच्या या आमदाराचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 9:31 PM

मुंबई – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिलाय. ते म्हणाले, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांवर बोलत राहिले, तर सरकारमध्येच वितुष्ट निर्माण होईल.  त्याचे परिणाम दोन्ही गटाला भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले, एक दिवस या सगळ्या गोष्टीमुळं दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ शकेल. त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला हा इशारा दिलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते हे अपमानास्पद बोलतात. भाजपच्या नेत्यांशी शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार करून बोललं पाहिजे. यानंतर अशाप्रकारचा अपमान आम्ही लोकं सहन करणार नाही. वरिष्ठ भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आणून देऊ. शिवाजी महाराज यांचा अपमान नेहमी होत असेल तर हे काही चांगलं नाही, असंही संजय गायकवाड म्हणाले.

दुसरीकडं संजय राऊत हे शिंदे गटाच्या आमदारांवर तुटून पडतात.  स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून शिवसेना फोडली. मग आता स्वाभिमान कुठं गेला. शिंदे राजीनामा कधी देणार, असा थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदे यांना केलाय.

औरंगजेबाचे आणि अफजलखानाच्या कबरी खोदण्याचे नाटकं कशाला करता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली. स्वाभिमानाचं तुणतुण वाजवत भाजपसोबत गेलेत. आता कुठं गेला तुमचा स्वाभिमान. अद्याप शिंदे गटाच्या आमदारांकडून निषेध करण्यात आला नाही. इतके तुम्ही घाबरता का, असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला.

अशा अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. शिवाजी महाराज यांना माफीवीर म्हटलं. तरीही तुम्ही सत्तेला चिटकून आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.