Corona vaccine: लसीबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी : राष्ट्रवादी
यावेळी त्यांनी जनतेत कोरोना लसीविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याची मागणी केली. | Nawab Malik
मुंबई: कोरोना लसीच्या (Corona vaccine) सुरक्षिततेविषयी अद्याप काही शंका आहेत. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. (PM Narendra Modi should inject Corona vaccine himself first)
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेत कोरोना लसीविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यामुळे आता भाजपकडून नवाब मलिक यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोरोना लसीकरणाच्या मोहीमेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा मोदींनी येत्या 16 तारखेपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले.
कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस यादरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
सीरम इन्स्टिट्यूटमधून उद्या पहिली लस रवाना होणार
पुण्याच्या सीरम इन्स्टि्ट्यूटमध्ये कोव्हिशील्ड लसीची निर्मिती करण्यात येत आहे. उद्या पहाटे ‘सीरम’मधून लसीची पहिली खेप रवाना होणार अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टि्यूटटला लसींसाठी ऑर्डरही दिली आहे. त्यानुसार भारत सरकारला लसीच्या एका कुपीसाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या:
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू; कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
(PM Narendra Modi should inject Corona vaccine himself first)