जे बंड शिवसेनेत तेच बंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कायदेशीर लढाईही तशीच होणार का?

| Updated on: Jul 03, 2023 | 10:36 PM

बंड होताना ज्या गोष्टी शिवसेनेत झाल्या त्याच गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसते. त्यामुळे जी कायदेशीर लढाई शिवसेनेच्या बाबतीत झाली. तीच लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही होणार आहे.

जे बंड शिवसेनेत तेच बंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कायदेशीर लढाईही तशीच होणार का?
Follow us on

मुंबई : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवलं. अजित पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. अनिल पाटील प्रतोद म्हणून निवडण्यात आले. जे बंड शिवसेनेत झालं तेच बंड आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसतं. बंड होताना ज्या गोष्टी शिवसेनेत झाल्या त्याच गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसते. त्यामुळे जी कायदेशीर लढाई शिवसेनेच्या बाबतीत झाली. तीच लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही होणार आहे.

सगळ्यात उत्तम ठिकाण सातारा

कुठं अन्याय, अत्याचार होत असेल. त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचं असेल तर सगळ्यात उत्तम ठिकाण सातारा, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी ९ मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार सर्वात आधी पोहचले ते सातारा जिल्ह्यात. कराडमध्ये जात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

राज ठाकरे यांची शंका

अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला होता. त्याला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना विचारल्याशिवाय असं करूच शकत नाही, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांची निवड

मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो. वरिष्ठांचा आशीर्वाद असा शब्द वापरला. आशीर्वाद म्हणणारे क्षुद्र बुद्धीचे आहेत. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना बडतर्फ केलं. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपद म्हणून निवड केली. तसेच प्रतोद पदीही जितेंद्र आव्हाड यांची निवड केली.

राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही गटांनी दावा ठोकलाय. आता प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या बंडामागे कोण. शरद पवार यांची पुढची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.