महाराष्ट्रात आशा घोषणांना थारा नाही; ‘बटोगे तो कटोगे’ नाऱ्यावर भाजपमधील या बड्या नेत्याचा घरचा आहेर

Batoge to Katoge : योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे असा नारा दिला होता. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वातावरण अचानक तापले. जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या नाऱ्यावर आक्षेप घेण्यात आला. अजित पवार यांनी या मुद्दावरून फारकत घेतल्यानंतर भाजपच्याच बड्या महिला नेत्याने आता घरचा आहेर दिला आहे.

महाराष्ट्रात आशा घोषणांना थारा नाही; 'बटोगे तो कटोगे' नाऱ्यावर भाजपमधील या बड्या नेत्याचा घरचा आहेर
पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 12:19 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बटोगे तो कटोगे नाऱ्यावरून राज्यात एकच रणकंदन सुरू झाले आहे. वाशीम येथे प्रचारासाठी आले असता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सभेत एक है तो नेक है असा नारा दिला होता. जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी असे नारे देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्याला विरोध केला होता. आता या बड्या महिला नेत्याने सुद्धा भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

अजित पवार हे आक्रमक

महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी सर्वात आधी बटोगे तो कटोगे या नाऱ्याला विरोध केला होता. त्यांनी या घोषणेचा खरपूस समाचार घेतला होता. या घोषणा उत्तर प्रदेशात चालत असतील, पण महाराष्ट्रात अशा गोष्टी चालत नाही. महाराष्ट्र हा साधु-संतांचा आणि शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. त्यांची शिकवण आमच्या रक्तात आहे. आम्ही त्यांच्याच मार्गावर जाणार आहोत. आम्ही मुस्लिमांच्या भावानांना ठेच लागू देणार नाही असा आक्रमक पवित्रा अजितदादांनी घेतला होता.

हे सुद्धा वाचा

आता पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर

भाजप नेत्या पंकजा मुंडे या पण आता मैदानात उतरल्या आहेत. महाराष्ट्रात कटोगे तो बटोगे या घोषणाची गरज नाही. पंकजा मुंडे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपले रोखठोक विचार मांडले. अशा नाऱ्यांची महाराष्ट्रात गरज नाही. आम्ही अशा नाऱ्यांचे समर्थन करू शकत नाही, असे मत त्यांनी मांडले.

विकास हाच मुख्य मुद्दा असल्याचे माझे मत आहे, असे भाजपाच्या विधान परिषदेच्या सदस्या पंकजा मुंडे यांनी सांगीतले. या धरतीवरील प्रत्येक माणसाला आपले मानने हे नेत्याचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात असे विषय आणणे योग्य नाही. उत्तर प्रदेशात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे योगींच्या वक्तव्याचा जो अर्थ आज काढण्यात येत आहे, कदाचित तो नसेलही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.