बंडखोर, गद्दार आमच्यासमोर काय टिकतील, संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारले

Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासह बंडखोरांवर हल्लाबोल केला. त्यांच्या शब्दांना प्रचारापूर्वीच धार लागली आहे.

बंडखोर, गद्दार आमच्यासमोर काय टिकतील, संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारले
राऊत यांची तिखट प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 11:32 AM

लोकसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी उमेदवारांच्या नावावरुन, मतदारसंघावरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. आता त्यावर समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात झाली आहे. तीव्र शाब्दिक हल्ले सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील अनेकांवर तोंडसूख घेतले. त्यांनी पहिला निशाणा साधला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, त्यांनी श्रीकांत शिंदे, बंडखोरांना पण इशारा दिला. काय म्हणाले संजय राऊत…

फडणवीस यांच्यावर टीका

एकेकाळी युतीत असलेले उद्धव ठाकरे गट आणि भाजप आता एकमेकांवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही, नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024 च्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावे, असा टोला त्यांनी हाणला.

हे सुद्धा वाचा

श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल

  • आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवली मध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चमजी. दिल्ली अभी दूर है, आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाहीत. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. कल्याण -डोंबिवली मध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही आम्ही तुमचा पराभव करू.
  • आम्ही नारायण राणे चा पराभव केलेला आहे, इंदिरा गांधींचा पराभव राज नारायण यांनी केला होता, महाराष्ट्रात अनेक मोठ मोठे लोक पडले आहेत, अजून हा बच्चा आहे स्वतःची उमेदवारी आधी जाहीर करा हिम्मत असेल तर महाराष्ट्रात सर्व उमेदवाऱ्या जाहीर झाल्या फक्त तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे, असा हल्लाबोल त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केला.

मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली

ज्यांची उमेदवारी कापण्यात आली त्यांना प्रश्न विचारा, नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे ,कल्याण -डोंबिवली मध्ये उमेदवार देऊ शकले नाही, जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागातील उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही, स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या, असा चिमटा राऊत यांनी काढला.

जागा वाटपाची प्रक्रिया संपली

  1. एखाद्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे असं मला वाटत नाही, महाविकास आघाडीच्या प्रत्येक बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे .जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे, याविषयीच्या बातम्या चुकीच्या असल्याचे ते म्हणाले.
  2. भिवंडी बाबतचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधला आहे, माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे तिथे उमेदवारी मागे घेतली जाईल अशी शक्यता बिलकुल नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
  3. आपण आणि शिवसेनेची मुंबईतील एक टीम उद्या सांगलीला जात आहे, आदित्य शिरोडकर यांना तिथे समन्वयक म्हणून नेमले आहेत, आम्ही सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहोत. तीन ते चार दिवस मी सांगलीच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.