नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाहीच, ईडीच्या विशेष न्यायालयानं फेटाळला जामिनाचा अर्ज

रुग्णालयात भरती असल्यानं त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात ही सुनावणी पार पडली.

नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाहीच, ईडीच्या विशेष न्यायालयानं फेटाळला जामिनाचा अर्ज
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 4:30 PM

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. नवाब मलिक यांचा जेलचा मुक्काम वाढला आहे. राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्या जामीन अर्जासाठी सुनावणी झाली होती. याप्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टानं निर्णय दिला आहे. नवाब मलिक यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळून लावलेला आहे. त्यामुळं तूर्तास नवाब मलिक यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुर्ला येथील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कारणासाठी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात मुंबईच्या ईडीच्या विशेष कोर्टात सुनावणी झाली.

न्यायाधीश रोकडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आज ईडीच्या विशेष कोर्टानं निर्णय दिला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा त्रास आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असल्यानं त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात ही सुनावणी पार पडली.

नवाब मलिक यांना आणखी काही दिवस कोठडीतच घालवावी लागणार आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाऊ शकतात. ते पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात. परंतु, सध्यातरी नवाव मलिक यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा मिळाला नाही. गोवावाला कंपाऊंडच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या ताब्यात आहेत.

फेब्रुवारी महिन्यात ईडीनं त्यांना अटक केली होती. टेरर फंडिंगचा आरोप लावण्यात आलाय. दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमिनीचे व्यवहार केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर टेरर फंडिंगसाठी केल्याचा आरोप आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.