…तर ठाकरे गट, काँग्रेस, वंचित नवी आघाडी? ,राज्यात दिसणार नवं राजकीय समीकरण?
मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल, असं उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांना बोलल्याचं समजतंय. मात्र जर वेळ आलीच तर, ठाकरे गट-काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकतात.
मुंबई : मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल, असं उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांना बोलल्याचं समजतंय. मात्र जर वेळ आलीच तर, ठाकरे गट-काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकतात.
भाजपसोबत जाण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही? निव्वळ अफवा आहेत हे अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य फार महत्वाचं आहे. मला एकट्यालाच भाजपसोबत लढावं लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांकडे केल्याची माहिती आहे..ज्याचा उल्लेख अजित पवारांनीही आपल्या पत्रकार परिषदेत केला पण राष्ट्रवादीत काही घडलंच तर, ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढू शकतात.
सोमवारीच त्याची झलक मातोश्रीवर दिसली. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली..या भेटीत विचारधारा वेगवेगळी असली आणि काही मुद्यांवर मतभेद असले तरी, एकत्र लढण्यावर एकमत झालंय..आणि उद्धव ठाकरेंना दिल्लीत येण्याचंही निमंत्रण देण्यात आलं असून ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटल्यानंतर राहुल गांधी मुंबईत येणार आहेत.
ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे..तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसोबत ठाकरे गटाची वेगळी युती आहे..पण वंचित महाविकास आघाडीत समाविष्ट झालेली नाही..त्याचं कारण आहे प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीला विरोध, त्यामुळं समजा राष्ट्रवादी किंवा अजित पवारांचा गट वेगळा झालाच तर वंचित आणि काँग्रेस ठाकरेंना साथ देऊ शकतात.
वेळ आल्यास भाजपविरोधी कोणाशीही एकत्र येऊन सोबत लढू असं पटोले म्हणतायत..अर्थात राजकारण समीकरण कधीही जुळतं आणि कधीही बिघडतं. त्यामुळं तूर्तास वेट अँड वॉच.