मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. मुंबईला विकासाकडं घेऊन जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. याशिवाय मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या आपला दवाखाना या योजनेचाही शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कमी वेळात देशातील लोकांनी ७५ हजार कोटी रुपयांचे डिजिटल ट्रान्झेक्शन केल्याचं सांगितलं. परिवर्तनाचा हा मार्ग निराशावाद्यांसाठी मोठा जबाब आहे. डिजिटल इंडिया यशस्वी झाला. सगळ्यांच्या सहकार्याने सर्व शक्य होते, असंही त्यांनी म्हंटलं.
मुंबईला विकासाच्या उंचीवर नेणार आहोत. तुम्ही माझ्या सोबत चला. तुम्ही दहा पाऊलं चालालं तर मी अकरा पाऊलं चालेन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
स्वनिधी योजना तुम्हाला मदत करण्यासाठी डिजिटल पेमेंट करा. यामुळं व्याजाचे पैसे लागणार नाही. मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल. मी तुमच्यासोबत उभा आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मुंबईत आलो, असंही त्यांनी भाषणात मुंबईकरांना सांगितलं.
४० हजार कोटी रुपयांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण मुंबईत झालं असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. रस्ते सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपला दवाखानाची सुरुवात करण्यात आली.
स्ट्रीट वेंडरला बँकेच्या खात्यात पैसे पोहचले. मुंबईकरांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देश भारत मोठे स्वप्न पाहत आहे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा विश्वास त्यांनी मुंबईकरांना दिला.
२०१४ मध्ये मुंबईत फक्त १४ किमी मेट्रो सुरु होती. पण जेव्हा तुम्ही डबल इंजिन सरकार आणलं तेव्हा मेट्रोचा विस्तार जोरात झाला. काही काळासाठी विस्ताराचा वेग मंदावला. पण शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलं. त्यानंतर पुन्हा वेगाने काम होऊ लागलं आहे. मुंबईत 300 किमी मेट्रो नेटवर्कसाठी आम्ही वेगाने धावत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
घर, टॉयलेट, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार, मेडिकल कॉलेज, आयआयटी, आयआयएम यांची निर्मिती होत आहे. ही विकासकामं मोठी काम करतील, असंही त्यांनी म्हंटलं.