निवडणूक आयोगाची लढाई सुरूच राहणार, उदय सामंत यांनी सांगितलं कारण
निवडणूक आयोगाची लढाई अद्याप संपलेली नाही.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली. उदय सामंत म्हणाले, ठाकरे गटानं कुठं जावं हा त्यांचा प्रश्न आहे. सकाळी नऊ वाजता ते कोर्टात जातात. अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा बंधनकारक असेल. समता परिषदेनं मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेलं चालेल का, असा सवाल उदय सामंत यांनी केला.
निवडणूक आयोगाचा निर्णय दोन्ही बाजूला ऐकूण घ्यावं लागेलं. निवडणूक आयोगाची लढाई अद्याप संपलेली नाही. ही लढाई अजून सुरू आहे. या पोटनिवडणुकीनंतर मेरिट निवडणूक आयोगाला दाखविणार आहोत.
अंधेरी पोटनिवडणुकीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यामुळे हे सगळे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. ऋतुजा लटकेबाबतही तेच निर्णय घेतील, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेना, भाजपचा उमेदवार अंधेरी पोटनिवडणुकात असेल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात लवकरच फॉस्कानसारखा एक मोठा प्रकल्प येणार आहे. कदाचित त्यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येईल, यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक झालेली आहे. लवकरच याबाबतची माहिती दिली जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
ते म्हणाले, आम्ही केवळ मुंबईपुरते मर्यादित नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या शाखा आता उभ्या राहतील. आम्हाला निशाणी मिळालेली आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. मुंबईतही ठिकठिकाणी आमच्या शाखा सुरू होत आहेत. मध्यवर्ती कार्यालय ही लवकरच कार्यरत होणार आहे, याचं लवकरच उद्घाटन होईल.