त्यांनी फक्त फिक्स डिपॉझिट केलं, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कोणावर?

तीन वर्षे मुंबई मनपा हे काम करू शकली नाही. मुंबईवाल्यांचं जमत नव्हतं. हिस्सेदारी मिळाली नाही. म्हणून हे काम त्यांनी केलं नव्हतं. या कामाला पूर्ण करण्याचं काम होत आहे.

त्यांनी फक्त फिक्स डिपॉझिट केलं, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कोणावर?
देवेंद्र फडणवीस Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 6:00 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दावोसवरून आले. त्याठिकाणाहून त्यांनी एक लाख ५५ हजार कोटीचं एमओयू केले. ही गुंतवणूक मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथील दौऱ्यात बोलताना फडणवीस म्हणाले, जगातील लोकप्रिय नेते पंतप्रधान मोदी आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं. लोकप्रियतेची स्पर्धा आहे. त्यात मुंबईकरांचं खूप प्रेम तुमच्यावर आहे, अशी स्तुतिसुमने फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर उधळली. मोदी यांनी २०१९ मध्ये म्हटलं होतं. पाच वर्षांच्या डबल इंजिननं विकासकामं केली. तशी पुढंही करू. पण, अडीच वर्षे जनतेच्या मनाची सरकार बनू शकले नाही. बाळासाहेबांचे सच्चे अनुयादी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. लोकांच्या मनातील सरकार बनली.

प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रम, फूटपाथ दुकानदार, सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची रचना केली. पण, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या योजनेला स्थगित केली होती. गरिबांच्या योजनेला स्थगिती दिली गेली. फुटपाथ दुकानदार होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मुंबईत १ लाख रेडीपटरी, फूटपाथ, फेरीवाल्यांना स्वनिधीचा फायदा देणार आहोत. एक लाख १५ हजार फेरीवाल्यांना स्वनिधीचा पैसा मिळतो. पंतप्रधानांच्या हस्ते हे काम करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मेट्रोचे उद्घाटन आणि भूमिपूजनही

मुंबईसारखा इतर ठिकाणीही हे पैसे मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ज्या योजनांचं भूमिपूजन केलं. त्या योजनेच्या भूमिपूजनालाही ते उपस्थित आहे. मेट्रोचे भूमिपूजन तुम्ही केलं. ३५ किलोमीटर मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्धाटनही तुम्ही करत आहात, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबईत एसटीपी करोडो लीटर पाणी घाण स्वच्छ न करता समुद्रात सोडत होतो. मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही. पण, मुख्यमंत्री असताना एसटीपी तयार करण्यासाठी सूचना मुंबई महापालिकेला केली होती. एसटीपी नार्मस तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत केली. समुद्रातील पाण्याचे नार्म तयार करण्यात आले. समुद्रात पाणी टाकण्यासाठी डिस्चार्ज नार्मस तयार करून घेतले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हिस्सेदारी न मिळाल्यानं काम झालं नव्हतं

तीन वर्षे मुंबई मनपा हे काम करू शकली नाही. मुंबईवाल्यांचं जमत नव्हतं. हिस्सेदारी मिळाली नाही. म्हणून हे काम त्यांनी केलं नव्हतं. या कामाला पूर्ण करण्याचं काम होत आहे. मोदी यांच्या सरकारमुळं हे काम होत आहे. सहा हजार कोटींचे रस्ते होत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

४० वर्षे खड्डा पडणार नाही, असं रस्ते बनविणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धारावीचा टेंडर तयार केलाय. एक लाख लोकांना पुनर्वसन करण्याचा हा प्रकल्प होणार आहे. यासाठी आपली मदत लागणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना म्हंटलं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.