या मार्गामुळे बोरीवली ते ठाणे अंतर पंधरा मिनिटांत पार होणार

| Updated on: Jan 18, 2023 | 7:55 AM

ठाण्याच्या घोडबंदर येथे होणारी वाहतूक कोंडीतून सूटका करण्यासाठी एमएमआरडीने बोरीवली ते ठाणे या भूयारी मार्गिकेची योजना आखली होती. या प्रकल्पाच्या टेंडरला एमएमआरडीएने गेल्याच आठवड्यात मंजूरी दिली आहे.

या मार्गामुळे बोरीवली ते ठाणे अंतर पंधरा मिनिटांत पार होणार
TWINTUNNEL
Image Credit source: TWINTUNNEL
Follow us on

मुंबई : ठाणे ते बोरीवली हे दीड तासांचे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येणाऱ्या एका प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अकरा किमीचे दोन बोगदे खणण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने सहा पदरी मल्टीमोडल हायवे बांधणार आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या टीकुजीनिवाडी ते बोरीवलीतील पश्चिम एक्सप्रेस हायवेला जोडणारा संजय गांधी उद्यानाच्या खालून जाणारा भूयारी मार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठी 11000 हजार कोटींचे टेंडर गेल्याच आठवड्यात काढले आहे. या भूयारी मार्गिकांचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणार आहे.

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानाखालून सहा पदरी महामार्गासाठी  11 किलोमीटरचे दोन टनेल खणण्यात येणार आहेत. त्यासाठी गेल्या आठवड्यात एमएमआरडीएने 11 हजार कोटीचे टेंडर काढले आहे. आम्ही संजय गांधी उद्यानातील या दोन भूयारी मार्गांसाठी आरेखन आणि बांधकाम यासाठी टनेल तसेच अॅप्रोच रोडच्या सिव्हील कामासाठी टेंडर काढले आहे. हा मार्ग 11.8 किमीचा असून तो ठाण्याच्या टीकूजीनिवाडी येथून सुरू होऊन बोरीवली वेर्स्टन एक्सप्रेस हायवेजवळ संपणार आहे. यात 10.25  किमीचे डबल लेन टनेल आणि 1.55 किमीचा जंक्शन असणार आहेत. तसेच हे दोन्ही टनेल 3 + 3 लेनचे असतील असे एका अधिकाऱ्याने स्पष्ठ केले.
एमएसआरडीसीने  मांडला होता मूळ प्रस्ताव
दोन पॅकेजमध्ये हे काम विभागून केले जाणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल आणि विस्तृत अहवाल मंजूर झाला असून वनविभागाकडे तो पाठवण्यात आला होता. त्यात त्यांनी काही बदल सुचवले होते. हे बोगदे खणण्यासाठी टनेल बोअरींग मशिनचा वापर होणार असून संजय गांधी उद्यानातील जैवविविधता पाहता अंत्यत काळजीपूर्वक हे काम केले जाणार आहे. ठाणे येथील घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक वर्दळीतून सूटका करण्यासाठी 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता.