मुंबई – जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली. आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. तो निर्णय़ ते योग्य पद्धतीनं घेतली, असं मला वाटते. कारण त्यांना बाबासाहेब यांचा वारस आहे. बाबासाहेबांचा वारस चालवत असताना मतं कुठं मिळतील, यापेक्षा बाबासाहेबांचा वारसा जपनं हे अधिक महत्त्वाचं असतं.
आम्ही वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून बघतो. उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचा ऐतिहासिक ठेवा जतन केला गेला पाहिजे. पंचायतची इमारत असो की, आंतरराष्ट्रीय सोशल जस्टीस मुव्हमेंट कशी पुढं नेता येईल, याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते, असं दीपक केसरकर म्हणाले. तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असंही ते म्हणाले.
विरोधक विरोध करणारचं आम्ही असतो तर हे झालं नसतं, असं म्हणतात. पण, अनेक गोष्टी केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. राज्याच्या नियंत्रणात काय आहे, याचा विचार करून स्टेटमेंट केली गेली पाहिजे. काहीही झाला की, ते सरकारवर टाकायचं हा रडीचा खेळ असतो, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद हा आजचा नाही. गेल्या ५० वर्षांपासून हा वाद सुरू आहे. बाळासाहेब म्हणाले होते की, सीमाभागातील नागरिकांचं हित जोपासू, हे तुम्ही अडीच वर्षे जोपासू शकले नाही, अशी टीकाही केसरकर यांनी केली.