मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजाराच्या पार गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत (Three Police at Matoshree tested corona positive) असताना, यामध्ये पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यभरात तब्बल 100 पोलिसांना कोरोनाची बादा झाली. यामध्ये मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या तीन पोलिसांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Three Police at Matoshree tested corona positive)
यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
राज्यभरातील 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोना
राज्यभरात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत 342 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. यापैकी 49 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर 290 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. कोरोना लागण झालेल्यांमध्ये 30 अधिकारी आणि 197 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापैकी 8 पोलीस अधिकारी आणि 22 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. दुर्दैव म्हणजे आतापर्यंत तीन पोलिसांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत
कोरोनाबाधित पोलिसांना मदत मिळावी म्हणून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ड्युटीवर असताना अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचं परिपत्रक नुकतंच मुंबई पोलीस दलातील प्रशासन विभागाचे सहआयुक्त नवल बजाज यांनी जारी केलं आहे. बक्षीस स्वरुपात ही रक्कम दिली जाणार आहे.
‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. ‘कोरोना’ संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली. (Maharashtra Police Grant during fight against Corona)
राज्यातील पोलिस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
(Three Police at Matoshree tested corona positive)
संबंधित बातम्या
‘कोरोना’ लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा
रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण, राज्यभरात 64 पोलिसांना कोरोना