उदयनराजेंनी एक घाव, दोन तुकडे केले, छत्रपतींवर वादग्रस्त बोलणाऱ्यांवर ‘त्यांनी’ थेट उपायच सांगितला…
ज्यांनी आपलं सर्व आयु्ष्य समाजासाठी अर्पित केलं, त्या माणसाबद्दल लायकी नसणाऱ्यांनी शिंतोडे उडवू नये आणि जनतेने अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे
मुंबईः राज्याच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वादाला तोंड फोडसले आहे. त्यामुळे आता सर्वस्तरातून त्यांच्यासह भाजपवरही टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आज नालासोपारा येथील मराठा उद्योजक लॉबी यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त उदयनराजे भोसले उपस्थित होते. त्यावेळी वसई विरारमधील मराठा समाजातर्फे त्यांच उत्सफुर्तपणे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी संवाद साधताना त्यांनी भाजपाचे प्रवक्ते सुदांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उदयनराजे यांनी सांगितले की, प्रत्येक पक्ष छत्रपती महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो पक्ष स्वतःच्या समाजकार्याला राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यापालांचे पद हे सन्मानाच पद आहे.
त्यांना आपण काय बोलावे हे कळायला पाहिजे. त्यांनी हे एकदा दोनदा केलं आहे. सुदांशु त्रिवेदी यांच्याविषयी बोलताना कुठला तो थर्डक्लास भिखारडा, अशा लोकांनी काही तरी शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं, आता आपण थेट पंतप्रदानांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोघांना माफी मागायला लावा. आणि सर्वात प्रथम यांना पदावरुन काढून टाका अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल ते त्यावेळी सांगणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांची ही ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणे गरजेच आहे. आपल्या शरीराला गॅगरीन झाल्यावर ज्याप्रमाणे आपण शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी आणि राज्यपालांना कापून फेकून दिलं पाहिजे अशी जहरी टीका उदयनराजे यांनी केली आहे.
ज्यांनी आपलं सर्व आयु्ष्य समाजासाठी अर्पित केलं, त्या माणसाबद्दल लायकी नसणाऱ्यांनी शिंतोडे उडवू नये आणि जनतेने अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे मग कुणी ही असो अशी जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
राहुल गांधी पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जावू द्या पण नियम सर्वांना सारखा आहे. कुणाविषयीही माहिती घेऊन बोलावे. माहिती नसेल तर माहिती घेवून बोलावे असं मत त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी व्यक्त केले.
ज्या सुंधाशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यांना चप्पलेने मारलं पाहिजे अशी जाहीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. ञिवेदी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी चोपून काढा असंही त्यांनी वक्तव्य केले आहे.