मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु
मुंबईत मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरु झाले आहेत. (Ticket Counter for Train Reservation Started at Railway Stations in Mumbai)
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवल्यामुळे देशात ठप्प झालेली प्रवासी रेल्वे सेवा दोन महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, चर्चगेट यासारख्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे (Ticket Counter for Train Reservation Started at Railway Stations in Mumbai)
येत्या 1 जूनपासून देशभरात 200 एक्स्प्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग काल सकाळी सुरु झाल्यानंतर प्रवाशांच्या अक्षरशः उड्या पडल्या. आता निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु करण्यात आले आहे.
मुंबईत मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरु झाले आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत, फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काऊंटरवर देण्यात येत आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळून तिकीट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सोडण्यात येत आहे. तसेच सुरक्षारक्षकही तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे.
Railways has green-lighted re-opening of Reservation Counters & booking through Common Service Centres & Agents from tomorrow
Zonal Railways will decide & notify opening of counters in a phased manner.https://t.co/YUv5FOdkG6 pic.twitter.com/IeiPM8olhJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 21, 2020
मुंबईत मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर तिकीट काऊंटर सुरु
सीएसएमटी – 4 एलटीटी – 3 दादर – 2 ठाणे – 2 कल्याण – 2 पनवेल 2 बदलापूर 1
(Ticket Counter for Train Reservation Started at Railway Stations in Mumbai)
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर तिकीट काउंटर सुरु
चर्चगेट -2 मुंबई सेंट्रल – 2 वसई रोड – 2
येत्या 1 जूनपासून देशभरात 200 नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. त्यासाठी 21 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आले, मात्र अवघ्या काही तासातच बुकिंग फुल झाले. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात घोषणा करुन शंभर ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले होते.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणार्क एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस 1 जूनपासून सुटणार आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून दरभंगा एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, तर वांद्रे टर्मिनसहून सूर्यनगरी एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या ट्रेन सुटणार आहेत.
पीआयबीच्या वेबसाईटवर 100 ट्रेनची यादी जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी ट्रेन मात्र पुढील आदेशापर्यंत रद्द राहतील.
संबंधित बातम्या :
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार
देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक पुन्हा सुरु होणार, तिकीट दर निश्चित, नियमावली जाहीर
(Ticket Counter for Train Reservation Started at Railway Stations in Mumbai)