Tipu Sultan : टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…तर काँग्रेसने भाजपला दाखवला राष्ट्रपतींचा आरसा

| Updated on: Jan 26, 2022 | 6:33 PM

सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.

Tipu Sultan : टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस...तर काँग्रेसने भाजपला दाखवला राष्ट्रपतींचा आरसा
पंडितजींनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली-फडवीस
Follow us on

मुंबई : मलाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. भाजपने (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलंय. यात अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपबरोबर या आंदोलनात बजरंग दलही सामील असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक तासांपासून मालाडमध्ये या आंदोलनामुळे हायव्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार पलटवार केलाय.

कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात आणि हिंदूंवर अनन्वित करणार्‍या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपा, विहिंप ,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक! याचा तीव्र निषेध अशा आशयाचे ट्विट केले आहे.

अतुल भातखळकर यांचेही ट्विटर

टिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही. असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही केले आहे.

भाजपला काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

भाजपच्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

भाजप नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलं, फडणवीस राजीनामा घेणार? अस्लम शेख यांचा सवाल

टिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, अनेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात

VIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी