लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार; दोन नराधम गजाआड
लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत गैरप्रकार (accused shows pornographic video to minor girls) करणाऱ्या दोन तरुणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.
टिटवाळा : टिटवाळामध्ये लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत गैरप्रकार (accused shows pornographic video to minor girls) करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. माधव मगर आणि विश्वनाथ तरणे असे या दोन्ही नराधमांची नावे आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस तपास लावत असून आतापर्यंत चार पीडित लहान मुलींची माहिती समोर आली आहे. नराधमांनी (accused shows pornographic video to minor girls) या चार मुली वगळता आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची शंका पोलिसांना आहे.
टिटवाळा येथील एका शाळेसमोर माधव मगर आणि विश्वनाथ तरणे या नराधमांचे समोसा-वडापाव आणि चायनिज सेंटरचे दुकान आहे. हे नराधम शाळेच्या वेळेत लहान मुलींना शाळेच्या परिसरात घेऊन जात आणि तिथे त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत. याशिवाय मुलींसोबत गैरप्रकारही करत असत. दरम्यान, एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करताना दिसले. त्या महिलेने तातडीने पीडित मुलीच्या आईला माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत माहिती काढली तर सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विश्वनाथ आणि माधवला अटक करून पुढील तपास सुरू केला. तपासात जे काही समोर आले ते बघून पोलीस देखील हैराण झाले. कारण या दोन नराधमांनी एक नाही तर अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या संदर्भात चार तक्रार पोलिसांकडे आल्या आहेत. याप्रकरणी अजून किती पीडित मुलींची नावे समोर येतात याचा शोध पोलीस घेत आहेत.