मुंबई : दिवाळीचा सण सरल्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागली होती. राज्यांतल्या अनेक भागांत पारा घसरायला सुरुवात झाली होती. मात्र आज (शुक्रवार) अचानक मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. (Today Rain in Mumbai Possibility of hailstorm in North Maharashtra District)
मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेने जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचं आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
मुंबईप्रमाणेच कोकणातल्याही काही भागांत आज सकाळी (शुक्रवार) पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी साडे-पाच सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळाल्या.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे . दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पारी खाली घसरायला सुरुवात झाली होती. यामुळे नागरिकांना थंडीची चाहूल लागली होती. मात्र आज अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. हिवाळ्यात पाऊस पडल्याने गुलाबी थंडीच्या ऐवजी पावसाच्या चर्चा जोरात रंगल्या. सोशल मीडियावर तर पावसावर मिम्स बनू लागले. हिवाळ्यात पाऊस, मग नक्की ऋतू कोणता?, असा मजेदार सवाल या मिम्समधून विचारण्यात येतोय.
(Today Rain in Mumbai Possibility of hailstorm in North Maharashtra District)
संबंधित बातम्या