राठोडांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक; महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, आज मोठ्या घडामोडी घडणार

पूजा चव्हाणा आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड हे आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. (sanjay rathore resignation)

राठोडांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक; महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, आज मोठ्या घडामोडी घडणार
शिवसेना नेते संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 10:05 AM

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याविषयी याविषयी आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सोमवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत संजय राठोड आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन या विषयांवर महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांचे एकमत झाले तर राठोड यांचा राजीनामासुद्धा घेतला जाण्याची शक्यता आहे. (today Sanjay Rathore may give resignation)

राठोडांच्या सदनाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, पूजा चव्हाण-संजय राठोड यांचे फोटो, तसेच काही कथित व्हिडीओ आणि कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधी पक्ष भाजपनेसुद्धा हा मुद्दा लावून धरला असून भाजप नेत्या चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील यांनी संजय रोठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांचे मुंबईतील छेडा या सदनाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. येथे त्यांच्या सदनाबाहेर 8 महिला पोलिसांचा ताफा असून त्यांचे परिसरातील हालचालींवर बारिक लक्ष आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपची दीड वाजता पत्रकार परिषद, काय भूमिका घेणार?

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप आक्रमक झाली असून भाजप नेत्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची रोखठोक मागणी केली आहे. जोपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. तसेच आजच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावरसुद्धा विरोधक बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आज ठीक दीड वाजता भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी संजय राठोड यांनी राजीनामा घेतला नाही तर भाजप काय भूमिका घेणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

राज्य विधिमंडळ अधिवेशन, विरोधक कोणत्या मुद्द्यांवरुन सभागृह दणाणून सोडणार?, कोणते मंत्री रडारवर?

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, आज राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

“मोहन डेलकरांनी भाजप प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव, सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख, त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.