Ajit Pawar DCM : अजित पवार सत्तेत सहभागी, दिवसभरात घडल्या या महत्त्वाच्या घडामोडी

Ajit Pawar DCM : सकाळी दहा वाजता सुप्रिया सुळे या देवगिरी बंगल्यावर पोहचल्या. रविवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांची प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले.

Ajit Pawar DCM : अजित पवार सत्तेत सहभागी, दिवसभरात घडल्या या महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 6:44 PM

मुंबई : रविवारी सकाळी पावणेनऊ वाजतापासून अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर समर्थक आमदार येण्यास सुरुवात झाली. दिग्गज नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येत होते. आमदार किरण लहामाटे, दौलत दरोडा सर्वात आधी अजित पवार यांच्या भेटीला आले. सकाळी नऊ वाजता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सकाळी साडेनऊ वाजता हसन मुश्रीफ, दिपील वळसे पाटील हे अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. सकाळी दहा वाजता सुप्रिया सुळे या देवगिरी बंगल्यावर पोहचल्या. रविवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांची प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले.

सुप्रिया सुळे दुपारी १२ वाजता बैठकीतून बाहेर निघाल्या

रविवारी सकाळी ११ वाजता समर्थक आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू झाली. सकाळी सव्वाअकरा वाजता बैठक सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ आणि काही आमदार पोहचले. दुपारी १२ वाजता सुप्रिया सुळे या देवगिरी निवासस्थानावरील बैठकीतून बाहेर निघाल्या. त्यानंतर पुन्हा साडेबारा वाजता सुप्रिया सुळे बैठकीत दाखल झाल्या.

उपमुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले

एक वाजून २२ मिनिटांनी अजित पवार हे सत्तेत सहभागी होणार ही बातमी सर्वात आधी टीव्ही ९ च्या हाती लागली. ती सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आली. दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी अजित पवार, छगन भुजबळांचे पीए राजभवनावर दाखल झाले. रविवारी दुपारी दीड वाजता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून राजभवनाकडे रवाना झाले. दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांनी अजित पवार आणि छगन भुजबळ समर्थक आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले.

९ आमदारांसह अजित पवार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

एक वाजून ४० मिनिटांना प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते राजभवनावर दाखल झाले. १ वाजून ४२ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस राजभवनावर पोहोचले. शपथविधीची तयारी पूर्ण झाली. १ वाजून ५० मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर दाखल झाले. दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेतली.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...