मुंबईत उद्याचा दिवस मोर्चा, आंदोलनांचा; महाविकास आघाडी नि भाजपतर्फे आंदोलनं नेमके कशासाठी?
ठाकरे गट खोटी माहिती पसरवतोय. त्यामुळं भाजपही मुंबईत माफी मांगो आंदोलन करणार. अशी घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
मुंबई : मुंबईमध्ये उद्याचा शनिवार हा मोर्चा आणि आंदोलनांचा आहे. महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केलंय. याच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनंसुद्धा माफीमांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा बुलंद आवाज उद्या मुंबईत दिसेल. तर दुसरीकडं, भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं की, मुंबईत उद्या भाजप माफी मांगो निदर्शनं करणार आहे. मुंबईत महाविकास आघाडी महामोर्चा विरुद्ध भाजपचं माफी मांगो आंदोलन होणार आहे. शनिवारी भाजप महाविकास आघाडीच्या महामोर्चाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणार आहे.
त्यासाठी भाजपनं संजय राऊत यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीमध्ये असं घडू नये. पण, दुर्दैवानं असं घडू नये. ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. ज्यांनी लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात हे घडतंय, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं म्हटलंय. ठाकरे गट खोटी माहिती पसरवतोय. त्यामुळं भाजपही मुंबईत माफी मांगो आंदोलन करणार. अशी घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रांमध्ये माफी मांगो आंदोलन केले जाणार. उद्धव ठाकरे माफी द्या. अजित पवार माफी द्या. नाना पटोले माफी द्या. असं आंदोलन मुंबईभर केलं जाणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.
माझ्याविरोधात मोर्चा काढणं म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या मोर्च्याला अपशकुन करणं होय. भाजपला वैफल्य आलेलं आहे. त्यातून हे सगळे प्रकार सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले.