पनवेल : नवीन पनवेलजवळील उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरत वाहतूक सुरळीत करण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे या पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. (Traffic Police Fill Potholes at New Panvel bridge)
नवीन पनवेल उड्डाणपुलावरुन पनवेलला येणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे सर्वच वाहनचालकांना वाहनं चालवताना या त्रासचा सामना करावा लागत होता. तसेच खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही या ठिकाणी होत असे.
हीच बाब लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता जेसीबीव्दारे जवळील असलेल्या रेतीच्या सहाय्याने खड्डे भरले. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पनवेल सर्व शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सह पोलीस उपनिरिक्षक वायंगणकर, हवालदार धनंजय घाडगे, महिला पोलीस शिपाई साधना पवार, ज्योती कहांडळ, पोलीस शिपाई निलेश भंगाळे इत्यादी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी हे काम केले.
वाहतूक पोलिसांचे काम वाहतूक कोंडी दूर करणं असतं. तर स्थानिक महापालिकेचे रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम असतानासुध्दा नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे भरल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांना ही समस्या उद्भवत असताना प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.(Traffic Police Fill Potholes at New Panvel bridge)
संबंधित बातम्या :