Aarey tree cutting : आरे कॉलनीत शेकडो झाडांवर कुऱ्हाड, पोलिसांकडून पर्यावरणप्रेमींची धरपकड
आरे मध्ये झाड कापायला सुरुवात झाली हे कळताच पर्यावरण प्रेमीनी आरे कॉलनीत धाव (Aarey tree cutting) घेतली. पर्यावरणी प्रेमींना आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास विरोध केला असता, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरेत एका रात्रीत झाडांची कत्तल (Aarey tree cutting) करण्यात आली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आरे कॉलनीतील जवळपास 250 ते 300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. आरे मध्ये झाड कापायला सुरुवात झाली हे कळताच पर्यावरण प्रेमीनी आरे कॉलनीत धाव (Aarey tree cutting) घेतली. पर्यावरणी प्रेमींना आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास विरोध केला असता, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व गोष्टीमुळे आरेतील रात्रभरापासून तणावाचे वातावरण पाहायला (Aarey tree cutting) मिळाले.
आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यास सुरुवात झाली. झाडं कापण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा याची माहिती मिळताच अनेकांनी कारशेडमध्ये घुसण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी याला विरोध केला. यामुळे अनेक संतप्त पर्यावरणप्रेमींनी झाडांना मिठी मारत झाड तोडण्यास विरोध दर्शवला.
‘आरे वाचवा’चे नारेही पर्यावरणप्रेमींनी दिले. मात्र पोलिसांनी यावेळी काहींना ताब्यात घेतलं. त्यामुळे काही वेळ आरे परिसरात रास्ता रोकोही करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी सरकार, एमएमआरसीएल (MMRCL) विरोधात संताप व्यक्त केला आहे.
मात्र हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत वेगवेगळ्या ठाण्यात नेलं. मात्र तरीही अनेक आंदोलक सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण मांडून बसले होते.
दरम्यान आरेतील वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. “आरेतील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरेतील झाडांची कत्तल करत आहेत, ते पाहाता त्यांना पाकव्यापत काश्मीरमध्ये पाठवायला हवं. त्यांना पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याचे काम सोपवायला हवं,” असा संताप आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and swiftly cutting down an ecosystem in Aarey is shameful and disgusting. How about posting these officials in PoK, giving them charge to destroy terror camps rather than trees?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
वृक्ष प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शुक्रवारी (4 ऑक्टोबर) हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अपलोड करण्यात आली. ही झाड कापण्यास 15 दिवसांचा कालावधी मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यापूर्वीच एमएमआरसीएल झाडांची कत्तल करायला सुरुवात केली.
पर्यावरणप्रेमी झोरु भथेना (Zoru Bhathena) व ‘वनशक्ती’ (Vanshakti) स्वयंसेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.