टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | शिंदे गटातील आमदार, खासदार नाराज, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा दावा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा झाला पण या दौऱ्यात काही आमदार, खासदार आणि मंत्री शिंदेंसोबत आले नाहीत. शिंदेंसोबत न जाणारा गट अस्वस्थ असल्याचं कायम चर्चेत असलेल्या नेत्याने दावा केलाय.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | शिंदे गटातील आमदार, खासदार नाराज, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा दावा!
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 11:48 PM

मुंबई : नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा झाला पण या दौऱ्यात काही आमदार, खासदार आणि मंत्री शिंदेंसोबत आले नाहीत. त्यावरुन राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केलीय. शिंदेंसोबत न जाणारा गट अस्वस्थ असल्याचं राऊत म्हणालेत.

शिंदेंच्या शिवसेनेत एक गट नाराज असल्याचा दावाच, संजय राऊतांनी केलाय. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत काही आमदार आणि खासदार नव्हते.त्याचं कनेक्शन राऊतांनी थेट नाराजीशी जोडलंय. शिंदेंच्या शिवसेनेत एक गट अस्वस्थ असल्याचं राऊतांचं म्हणणंय.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, आमदार सदा सरवणकर, आमदार किशोर पाटील, आमदार प्रताप सरनाईकही नव्हते. पण त्यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक अयोध्येला गेले होते..आमदार यामिनी दळवी उपस्थित नव्हत्या. आमदार बच्चू कडूहीसोबत नव्हते. तर खासदारांपैकी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळीही शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात नव्हत्या. खासदार गजानन किर्तीकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार राजेंद्र गावितही अनुपस्थित होते

शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन झालं…पण या दौऱ्यात शिंदे, गुंड आणि मवालींनाही घेऊन गेले, अशी जोरदार टीकाही राऊतांनी केलीय. अयोध्येला जात असतानाचा विमानातील हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालाय…काळा चष्मा घातलेला हा आहे, गुंड सिद्धेश अभंगे.. हा फोटो ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही ट्विट करत हल्लाबोल केलाय.

काय हा फडतूसपणा.अगोदर गुजरातला वॉशिंग मशिन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला धुवायला नेलेलं वाटतं. ते ही मुख्यमंत्र्यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालतं का फडणवीसजी? सिद्धेश अभंगेनं 2019मध्ये शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत येताच ठाण्यात माथाडी सेनेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. सत्तांतरानंतर अभंगे शिंदेंसोबत आला खंडणी, हाणामारी, धमकावणे, शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विक्री सारखे एकूण 13 गुन्हे सिद्धेश अभंगेवर दाखल आहेत.

मुंबईपासून ते अयोध्येतही स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना चोख सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्या सुरक्षावरुनही राऊतांना निशाणा साधलाय. गद्दारीमुळं लोकं मारतील म्हणून सुरक्षा देण्यात आल्याची खोचक टीका राऊतांनी केलीय. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच, मंत्री आमदार खासदार आणि नेत्यांना घेऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं.पण जे दौऱ्यात नव्हते, त्यांचं कनेक्शन अवस्थेशी जोडून राऊतांनी, सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मात्र अयोध्येला गैरहजर राहिलेल्या नेत्यांनी राऊतांना त्यांच्याच स्टाईलनं उत्तर दिलंय.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.