Devendra Fadnavis : अजितदादांसोबतची युती नॅचरल नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले तरी काय
Devendra Fadnavis : शिवसेनेसोबत आमची नॅचरल युती होती. पण अजितदादांसोबत युती नॅचरल नाही, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. टीव्ही9 मराठी कान्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलनात फडणवीस यांच्या विधानाने राजकीय कार्यकर्त्यांचे कान टवकारले.
शिवसेनेसोबत आमची नॅचरल युती होती. पण अजितदादांसोबत युती नॅचरल नाही, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. टीव्ही9 मराठी कान्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलनात फडणवीस यांच्या विधानाने राजकीय कार्यकर्त्यांचे कान टवकारले. व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नैसर्गिक युती नाही
आमची आणि शिवसेनेची युती नॅचरल आहे. वर्षानुवर्ष एका विचाराने आम्ही काम करत आहोत. त्यानंतर राजकीय परिस्थिती निर्माण झाली. अजितदादा सोबत आले. त्यांना सोबत घेतले. ती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय होती. अजून पाच दहा वर्ष गेले तर आमची त्यांच्याशी नॅचरल युती होईल. पण आजच नॅचरल युती आहे, असं म्हणाल तर अजितदादांशी नॅचरल युती नाही. हे खरं आहे. जे स्पष्ट आहे ते बोलतो. राजकीय युती आहे, म्हणजे ती तकलादू नाही. राजकीय यूती ही अनेक वर्ष चालते. आमचीही चालेल, असे ते म्हणाले.
लोकसभेत आमचेही मते त्यांना मिळाली नाही
आपण लोकसभेचं अॅनालिसिसी केलं तर फक्त तीन टक्के मतांचा फरक आहे. पण त्यांच्या सीटमधला फरक मोठा झाला. जेवढ्या नॅचरली भाजपचे सेनेला आणि सेनेचे भाजपला मते गेली. तेवढे एनसीपीचे झाले नाही. एनसीपी पहिल्यांदा लढत होती. त्यांना सेटल करणं गरजेचं होतं. आता या निवडणुकीत दोघांची मतेही ट्रान्स्फर होतील. लोकसभेत आमचेही मते त्यांना मिळाली नाही. पण आम्ही त्यांना तुलनेने जास्त मते दिले. विधानसभेत असं होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
अजितदादांसोबत युती करून चूक नाही
चूक झाली असं म्हणणार नाही. काळाची गरज होती. काळाची गरज असताना संधी आली तर कधी सोडायची नसते. सेटल व्हायला वेळ लागतो. सेटल होईल त्याचा फायदा होईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. अजितदादांना आमचा गुण लागेल, थोडावेळ द्या, असा चिमटा पण त्यांनी काढला.