Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘कुटुंबात फूट पडू देऊ नका, मी चूक केली’; अजित पवारांची कबुली, पाहा Video

कुटुंबात फूट पडू देऊ नका, माझी चूक झाल्याचं कबुल करतो असं अजित पवार जाहीरपणे बोललेत. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्याच,शरद पवारांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावरुन दादांनी भाग्यश्री आत्रामांना बाबांसोबत राहण्याचासल्ला देत, स्वत:कडून चूक झाल्याचं म्हटलंय. घरात फूट पडू देऊ नका. मी माझी चूक मान्य करतो असं म्हणत. बंडामुळं पवार घराण्यात जी फूट पडली, त्यावरुन अजित पवारांनी जाहीर कबुली दिलीय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 'कुटुंबात फूट पडू देऊ नका, मी चूक केली'; अजित पवारांची कबुली, पाहा Video
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 11:57 PM

अजित पवारांनी आधी काका शरद पवारांच्याच विरोधात बंड केलं आणि 40 आमदारांसोबत महायुतीत सहभागी झाले. पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अजित पवारांना मिळाला. त्यातच लोकसभा निवडणुकीत बारामतीतून, बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच उभं केलं. अजित पवारांच्या या भूमिकेमुळं पवार कुटुंबातही एकटे पडले. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनीही दादांना साथ न देता शरद पवारांच्या बाजूनं उभे राहिलेत.

गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा झाली. दादांचे मंत्री धर्मराव बाबाआत्राम यांची मुलगीच, भाग्यश्री आत्राम हलगेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यावरुन आपण चूक केली तसंच करुन नका, असा सल्ला दिला. त्याचवेळी काही जण घर फोडण्याचं काम करत असल्याचं आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

पाहा व्हिडीओ:-

मंत्री धर्मरावबाबा आत्रामांनीही, माझ्याच विरोधात मुलीला उभं करण्याचा डाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असून जी मुलगी माझी झाली नाही ती तुमची काय होणार अशी टीका आत्रामांनी केली. तसंच मुलीसह सर्व हलगेकर कुटुंबच नदीत टाकणार, असा इशाराच आत्रामांनी दिला. धर्मराव बाबा आत्राम,शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. मात्र त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्रामही वडिलांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. अहेरी विधानसभेतून, वडील विरुद्ध मुलगी असाच सामना होण्याची दाट शक्यता आहे.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.