Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीत पत्रकारांसह यूट्यूबर्सना पैसे वाटल्याचा भाजपमधूनच आरोप

लोकसभा निवडणुकीत भाजपनं पैसे वाटले का ते कोणत्या नॅरेटिव्हसाठी होते., असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. या वादाची सुरुवात राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकरांचा एक व्हिडीओ आणि भाजप पदाधिकाऱ्यानंच बजावलेल्या एका नोटिशीवरुन झाली.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीत पत्रकारांसह यूट्यूबर्सना पैसे वाटल्याचा भाजपमधूनच आरोप
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 11:24 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पत्रकारांसह यूट्यूबर्स आणि विविध फ्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांना पैसे दिले गेले, असा धक्कादायक आरोप खुद्द भाजपमधूनच सुरु झालाय. त्यावर फडणवीसांच्या शिष्ठाईनं पडदा पडला. मात्र प्रचारासाठी कोट्यवधी रुपये सरकारचे होते का? सोशल मीडियात कोणतं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते पैसे खर्च झाले? याची उत्तरं द्या म्हणून विरोधक भाजपला सवाल करताय.

नेमकं घडलं काय., ते समजून घेऊयात. भाऊ तोरसेकर पत्रकार, राजकीय विश्लेषक, यूट्यूबर अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. तर महाराष्ट्र भाजपच्या मीडिया सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी श्वेता शालिनी सांभाळतात. भाजपचा पराभव हा विरोधकांच्या खोट्या प्रचारानं झाल्याचा दावा फडणवीसांनी केला. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांच्याच दाखल्यानं तोरसेकर म्हणाले की निवडणुकीत श्वेता शालिनी यांनी भाजपविरोधी यूट्यूबर्स, पत्रकारांनाच पैसे दिले. उलट भाजपला मदतनीस ठरतील अशा पत्रकारांना वंचित ठेवलं गेलं.

पाहा व्हिडीओ:-

या व्हिडीओनंतर श्वेता शालिनी यांनी तोरसेकरांना नोटीस पाठवली. शहानिशा न करता, एकतर्फी व्हिडीओ बनवून आपली बदनामी झाल्याचा दावा त्यांनी केला., यावर सोशल मीडियातले भाजप समर्थक खवळले. फडणवीसांना मध्यस्ती करावी लागली. माहितीनुसार अखेर खुद्द फडणवीसांनीच गैरसमज झाल्याचं सांगून तोरसेकरांची समजूत काढली, आणि त्यानंतर श्वेता शालिनींनी नोटीसीबद्दल तोरसेकरांची माफीही मागितली. इथं वाद थांबला. मात्र पाण्यासारखा पैसा कुणी खर्च केला. काय नॅरेटिव्ह सेट केलं गेलं., यावरुन विरोधक आक्रमक झाले.

या वादात आपलं नाव का इतकं मोठं केलं गेलं., यानं भाऊ हैराण झाले..थोडक्यात खावून गेलं अख्खं गाव….आणि आलं भाऊंचं नाव असा प्रकार घडला. कारण, समर्थकांची भूमिका भाऊंनी जाहीरपणे मांडली. विशेष म्हणजे भाऊंनी श्वेता शालिनींची बाजू समजून न घेता फक्त समर्थकांच्या हवाल्यानं व्हिडीओ केला. आणि दुसरीकडे अद्याप श्वेता यांची नोटीस मिळाली नाही म्हणून प्रतिक्रियेस नकारही दिला.

महाराष्ट्रात या घडीला भाऊंइतका बुजुर्ग पत्रकार आणि निष्पक्ष विश्लेषक कुणीही नाही. पण पुरोगामी मंडळी भाऊंना कायम भाजप समर्थक ठरवते. त्यात खुद्द भाजपच्या श्वेता शालिनी यांनीच आपल्या ट्विटमध्ये ”आपसात” असा उल्लेख करुन भाऊंना भाजपसोबत जोडून घेतलं. शालिनी म्हणाल्या की, यावेळी आपसात न भांडता २०२४ च्या लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या सुधारून २०२४ च्या विधानसभेसाठी आपण काम करावे. आणि त्या कामात आपल्या सारख्या वरिष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका आहे. लवकरच प्रत्यक्ष भेटून जो काही आपला गैरसमज झाला तो दूर करून आपण सोबत कार्य करू अशी अपेक्षा आहे.

भाऊ आपलं बरंचसं विश्लेषण ”सब घोडे बारा टके” हा आधार धरुन करतात. एकीकडे ते पत्रकारांना वेश्या म्हणतात., दुसरीकडे वृ्त्तवाहिन्या पाहत नसल्याचा दावा करतात.आणि तिसरीकडे वृ्त्तवाहिन्यांतल्याच प्रतिक्रियांवरुन राजकीय विश्लेषणाचे व्हिडीओही बनवतात. साधारण 10 महिन्यांपूर्वी बावनकुळेंनी पत्रकारांना चहा पाजा- ढाब्यावर न्या लोकसभा निकालापर्यंत भाजपविरोधातल्या बातम्या येवू देवू नका अशा सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यावर पत्रकारांकडूनच टीकेची झोड उठली. तेव्हा तोरसेकरांनी बावनकुळेंचं समर्थन केलं होतं. आज मात्र साधनांऐवजी भाजपनं कार्यकर्त्यांवर फोकस का केला नाही., अशी तक्रार भाऊंची आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.