Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 17 तारखेला आर-पार, अंजली दमानिया यांचे अजित पवारांना ओपन चॅलेंज, पाहा Video
अंजली दमानियांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा अजित पवारांकडे वळवलाय..17 तारखेला आपण लंडनहून मुंबईला येत आहे. माझ्या 3 वर्षांच्या उत्पन्नाची कागदपत्र मी आणते, अजित पवारांनीही आणावीत, असं आव्हान दमानियांनी दिलंय. वाचा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
अंजली दमानिया आणि अजित पवारांमधला वाद आता उत्पन्नापर्यंत आलाय. रिचार्जवाली बाई म्हणत दमानियांनी परदेश दौरे आणि उत्पन्नाचे स्रोत सांगावे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांनी निशाणा साधला. त्यावरुन आपण 17 तारखेला, उत्पन्नाचे कागदपत्र घेवून मुंबईत येते. अजित पवारांनीही यावं, असं चॅलेंज दमानियांनी दिलंय. अंजली दमानिया सध्या लंडनमध्ये आहेत..पुन्हा अजित पवारांसोबतच्या वादाची सुरुवात, दमानियांच्याच ट्विटनं झाली. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून, अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये फिरतायत. त्याच गुलाबी जॅकेटवरुन दमानियांनी अजित पवारांना डिवचलं.
गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न करणे, भ्रष्टाचार न कारणे हा जनतेचा खरा सन्मान होईल. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जैकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो. तर अंजली दमानियांनी उत्पन्नाचे कागदपत्र घेवून यावेत, असं आव्हान दिल्यानंतर अजित पवारांना तेवढंच काम नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
पाहा व्हिडीओ:-
अंजली दमानिया आणि अजित पवारांमधला वाद, राहून राहून वर येत असतो. आता दमानियांनी 17 तारखेला लंडनहून परत येणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं 17 तारखेला दमानिया काय करतात दिसेलच.