Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, नेमकं काय आहे प्रकरण, पाहा video
बच्चू कडूंनी अमरावतीच्या पोलीस निरीक्षकांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख केलाय. नेमकं काय प्रकरण आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.
बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या एका बातमीनं खळबळ उडालीय. यासंदर्भात बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलंय. माझ्या जीवाला धोका असून माझा अपघात झाल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा कडूंकडून पत्रात उल्लेख करण्यात आलाय.
दरम्यान पोलिसांना लिहिलेल्या पत्रात काय आहे?, कोणामुळे बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे. आज सकाळी गोपनीय माहितीनुसार, मला 2 संदेश मिळाले त्यामधून पहिल्या संदेशामध्ये 4 मे, 2024 रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील प्रवाशी निवाऱ्याजवळील भाजीपाला विक्रेत्याजवळ प्लेजर दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला. आणि भाजीपाला विक्रेत्यासबोत चर्चा करताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली इथं राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजीकचे संबध आहेत. बच्चू कडूला बघून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवलं तसेच शिंदे हे बच्चू कडूंना संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार.
दुसऱ्या संदेशात आज मौका देख के कडू का चौका मारेंगे’, असा संवाद केला. तसंच माझा अपघात झाला असल्याबाबतचे 2 ते 3 दिवसापासून माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे मला फोन येत आहेत. दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधित व्यतींवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावं.
दरम्यान गृहखातं सक्षम असून यासंदर्भतला तपास करुन आरोपींचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येणार असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. तर बच्चू कडूंच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय. बच्चू कडूंनी पोलीस प्रशासनाला लिहिलेल्या पत्रानंतर राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासानानं म्हटलंय.