Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video

उद्धव ठाकरे महायुतीला सोडून गेल्यानं भाजपचं नुकसान झालं, अशी कबुली दानवेंनी दिली. मात्र अचानक दानवे असं का बोलले, यामागे नेमकं काय टायमिंग अशी चर्चा सुरु झाली. वाचा टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 9:16 PM

भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य फार मोठं आहे. अजित पवारांच्या येण्यामुळं भाजपचं नुकसान झालं नाही..तर उद्धव ठाकरे धोका देवून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं, असं बेधडकपणे रावसाहेब म्हणालेत. TV9शी बोलताना, दानवेंनी ठाकरेंबद्दल धोका शब्द वापरला. तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही दानवेंनी उद्धव ठाकरेंमुळंच भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेचीच सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्यात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीलाच पसंती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाला.

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि सांगलीत मूळ काँग्रेसचेच पण अपक्ष लढलेले विशाल पाटील विजयी झाले आता ते काँग्रेससोबतच आहेत. म्हणजेच मविआचा आकडा 31वर गेलाय तर महायुती अवघ्या 17 जागांवर आटोपली. रावसाहेब दानवे फक्त भाजपचेच नेते नाहीत..तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना, निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक केलंय. म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचं पद दानवेंना दिलंय. अशा वेळी, उद्धव ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान असं बोलणं म्हणजे, महाविकास आघाडीला आयतीचं संधी देणं आहे.

पाहा व्हिडीओ:-

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका, जालन्यात स्वत: रावसाहेब दानवेंनाही बसला. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी भाजपच्या दानवेंना 1 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं. आता, विधानसभेतही जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल का?, या प्रश्नावर दानवेंचं काय म्हणणंय तेही ऐका. विधानसभेच्या निवडणुका 2 अडीच महिन्यांवर आल्यात. सध्या जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यातच दानवेंनी, ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान म्हणणं म्हणजे, महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देण्यासारखं आहे.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.