Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, पवारांच्या पलटवारानंतर भाजप नेते आक्रमक

अमित शाहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार म्हटलं. त्या टीकेला पवारांनी 5 दिवसांनी छत्रपती संभाजी नगरमधून उत्तर दिलंय. सुप्रीम कोर्टानं तडपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा जळजळीत पलटवार पवारांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, पवारांच्या पलटवारानंतर भाजप नेते आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 9:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हटल्यानंतर पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा पलटवार पवारांनी केला. आता अमित शाहांनी तडीपार म्हटल्यानंतर भाजपचे नेते आणखी आक्रमक झालेत.

जुलैला पुण्यातून अमित शाहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार म्हटलं. त्या टीकेला पवारांनी 5 दिवसांनी छत्रपती संभाजी नगरमधून उत्तर दिलंय. सुप्रीम कोर्टानं तडपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा जळजळीत पलटवार पवारांनी केलाय. शरद पवारांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उत्तर दिलंय. शरद पवारांची अमित शाहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे, असं बावनकुळे म्हणाले. पण त्यावर पुन्हा पवारांनी तोच दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिल्याचं सांगून आणखी डिवचलं.

पाहा व्हिडीओ:-

लोकसभेच्या निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या प्रचारातही मोदी आणि अमित शाहांच्या निशाण्यावर शरद पवारच अधिक वेळ होते. पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनातूनही अमित शाहांनी पवारांवर भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी टीका केली. पण पवारांनीही अमित शाहांना तडीपार म्हटलं. त्यामुळं भाजपची ब्रिगेडचं मैदानात उतरली.

शरद पवार फक्त अमित शाहांच्या टीकेचा समाचार घेण्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चिमटा काढला. शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो, असं काही वर्षांपूर्वी पवार म्हणाले होते. मात्र माझ्या बोटांवर माझा विश्वास असून मी असं कोणाच्या हाती बोट देणार नाही, असा टोला लगावत पवारांनी मोदींच्या वक्तव्याचं खंडण केलं. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती विचित्र झालीय. 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी झाली असून त्यापैकी एक शिवसेना, एक राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. त्यामुळं टीका टिप्पणीसाठीही मर्यादा आल्यात. पण शाब्दिक चकमक आता भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार पासून तडीपार पर्यंत आलीय.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....