Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | मित्रपक्षांची गर्दी, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोंडी, पाहा व्हिडीओ
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा आपली खंत व्यक्त करुन दाखवलीय. माझ्यासोबत दगाफटका झाला. राजकीय वनवास मिळाला अशी तीव्र भावना बीडमध्ये पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय. टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा उघड उघड नाराजी व्यक्त करुन दाखवलीय. माझ्यासोबत दगाफटका झाला राजकीय वनवास मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पंकजा मुंडे यांना पक्षात आजही सन्मान आहे आणि उद्याही राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा आपली खंत व्यक्त करुन दाखवलीय. माझ्यासोबत दगाफटका झाला. राजकीय वनवास मिळाला अशी तीव्र भावना बीडमध्ये पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय. मात्र, यानंतर जनतेचं १० पट जास्त प्रेम मिळाल्याचंही पंकजा मुंडेंनी म्हटंलय. तर पंकजा मुंडेंच नव्हे भाजपचे १० मंत्री सोडले तर इतर सर्व मंत्री वनवासात असल्याचा टोला अनिल देशमुखांनी भाजपला लगावलाय.
पाहा व्हिडीओ:-
अजितदादा गट महायुतीत आल्यामुळे परळीची जागा धनंजय मुंडेंना सुटणार अशा चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर यावर शिक्कामोर्तब झाला का? असा सवाल आता उपस्थित होतोय. 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिला नसल्याची भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय.
भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरुय, राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव देखील चर्चेत आहे. मात्र, विधानपरिषद आणि राज्यसभा आली की माझं नाव चर्चेत येतं असं मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय. विधानपरिषद, राज्यसभा आल्यावर नाव चर्चेत येतं. पंकजा मुंडेंवर राजकारणात नेहमीच अन्याय झालाय. त्यामुळे त्यांच्या मनातील खदखद त्या बाहेर काढणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. दरम्यान पंकजा मुंडेंचा आजही पक्षात सन्मान आहे आणि उद्याही असेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय..
पंकजा मुंडे मनातील खदखद बाहेर काढतील. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत देत प्रतिस्पर्धी उमेदवाऱ्याला इशारा दिला होता. 2019 मध्ये पडले ते झालं, मात्र, आता पाडणार असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला होता. मात्र, त्याच पंकजा मुंडेंनी आपल्याकडे मतदारसंघ उरला नसल्याची भावना आता व्यक्त करुन दाखवलीय. पडले ते झालं, आता पाडणार आहे. 6 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान त्यानंतर आज बीडमध्ये बोलताना पंकजा मुंडेंनी आपली खंत व्यक्त करुन दाखवलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही? हे पाहणं महत्तवाचं ठरणारय.