Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वाघनखं साताऱ्यात, कसा सुरु झाला वाघनखांवरुन इतिहासाचा वाद? पाहा Video
बहुचर्चित शिवकालीन वाघनखं अखेर लंडनहून सातारच्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी मांडण्यात आली आहेत. पुढची ३ वर्ष ही वाघनखं महाराष्ट्रातल्या विविध 4 संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी येतील. शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष अफजल खान वधावेळी वापरली होती. यावरुन दावे-प्रतिदावे कायम आहेत.
ऐतिहासिक वाघनखं अखेर लंडनच्या संग्रहालयातून सातारच्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी उपलब्ध झालीयत. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हजेरीत प्रदर्शनाचा सोहळा पार पडला. इतर शिवकालीन वस्तू आणि शस्र या प्रदर्शनात असल्यामुळे प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ नाव दिलं गेलंय. मात्र ही वाखनखं शिवकालीन आहेत की शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष अफजल खान वधावेळी वापरली होती. यावरुन दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिवाय मुंबईहून साताऱ्यात वाघनखं वाजत-गाजत न आणता गुपचूप का आणली गेली. सातारच्या संग्रहालयात मागच्या दारानं प्रदर्शनात का मांडली गेली., यावरुन आरोप-प्रत्यारोपही होतायत.
दोन थिअरी मांडल्या जातात. जी वाघनखं आज सातारच्या संग्रहालयात मांडण्यात आली. ती महाराष्ट्रातून लंडनला नेली होती ग्रॅड डफनं ग्रॅड डप हा इंग्रज अधिकारी होता., ज्यानं मराठ्यांचा इतिहासही लिहिलाय. ग्रॅड डफ आणि सातारचे राजे प्रतापसिंह यांची मैत्रीही होती. त्यानिमित्त 18 व्या शतकात प्रतापसिंहांनी ग्रॅड डफला भेट म्हणून वाघनखं दिली. ती वाघनखं घेऊन डफ ब्रिटनमध्ये परतला. पुढे ग्रॅड डपच्या नातवानं ही वाघनखं ब्रिटनच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिली.
इतिहासकार सावंतांचा आक्षेप हा आहे की सातारच्या प्रतापसिंहांनी 18 व्या शतकात ग्रॅड डफला वाघनखं भेट दिली मात्र 1907 साली सातारच्याच संस्थानातला एक फोटो मॉडर्न रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाला होता, ज्या फोटोत सुद्दा गादीवर वाघनखं आहेत. त्यामुळे जर 1907 पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात होती तर मग 18 व्या शतकात डफनं नेलेली वाघनखं ही शिवरायांनी वापरलेली वाघनखं आहेत, असा दावा करणं चुकीचं असल्याचं इतिहासकार म्हणतात. मात्र सरकारच्या मते हा दावा चूक असून ही तीच वाघनखं आहेत., जी शिवरायांनी वापरलेली होती. तूर्तास पुढच्या ३ वर्षांसाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत.
सातारच्या संग्रहालयानंतर मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात, त्यानंतर नागपूरच्या सेंट्रल म्युझियमध्ये त्यानंतर कोल्हापूरच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये वाखनखं पाहता येणार आहेत