Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेला स्वबळावर लढण्याचे पटोलेंचे सूर, पवार आणि ठाकरेंचं काय?
लोकसभेच्या निकाल लागल्यावर काँग्रेस पक्षान विधानसभेच्या निवडणुकीआधी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याचं नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून दिसत आहे. यासंदर्भात टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या. आता नाना पटोलेंनी सर्व 288 जागांवर तयारी सुरु आहे, असं सांगून स्वबळाचा इशारा दिला. तर मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं म्हटलंय. भंडाऱ्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, सर्व 288 विधानसभेच्या जागेवर काँग्रेसची तयारी सुरु झाल्याचं सांगितलं. इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या पहिल्या प्राथमिक बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं जाहीर केलं.
महाविकास आघाडीच्या बैठकीला, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित होते.. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांनी हजेरी लावली. आणि आपल्या गैरहजेरीला पूर्वनियोजित दौऱ्याचं कारण पटोलेंनी दिलं. तर शरद पवारांनी, लोकसभेतल्या मोदींच्या 18 सभांवरुन चिमटा काढला. मोदींच्या सभा झाल्या तिथं, महाविकास आघाडीलाच फायदा झाला. विधानसभेतही आमचाच फायदा होईल, असं शरद पवार म्हणालेत.
पाहा व्हिडीओ:-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं स्पष्ट दिसलं. उद्धव ठाकरेंनीही कबुली दिली. त्यावरुन भाजपकडून ठाकरेंना घेराव सुरु आहे. सोडून गेलेल्या आमदारांवरही उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलीय. जे सोडून गेलेत, त्यांना परत घेणार नाही, असं ठाकरे क्लीअर कट बोललेत. त्याचवेळी वंचित आघाडीला सोबत घेणार का ? यावर स्पष्ट बोलणं टाळलं. विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी कामाला लागलीय. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक चर्चाही झाली.