Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महायुतीत वादाची मालिका सुरूच, नेमकं काय घडलं?

महायुतीमधील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. तळकोकणात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यात वाद निर्माण झालाय. तर पुण्याच्या हडपसरमध्ये देखील विकासकमाच्या श्रेयावरुन अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळाला.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महायुतीत वादाची मालिका सुरूच, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 11:21 PM

तळकोकणात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळलाय. सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासकामांवरुन राजन तेलींनी केसरकरांना धारेवर धरत, मतदारसंघावर दावा सांगितलाय. युती म्हणून केसरकरांना मदत केल्यास सावंतवाडीची जनता माफ करणार नसल्याचं म्हणत तेलींनी केसरकरांवर निशाणा साधलाय.

एकीकडे कोकणात महायुतीत वाद रंगलाय. तर दुसरीकडे पुण्यातही महायुतीमध्ये श्रेयवादावरुन लढाई सुरु आहे. अजितदादांचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकावरही भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलंय.

पाहा  व्हिडीओ:-

महायुतीमधला हा काही पहिला वाद नाहीये. मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये वादांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्याला नालायक म्हटलं होतं. त्यावरुन देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एवढचं नव्हे शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेससंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतरही महायुतीत वाद निर्माण झाला होता

एकीकडे महायुतीत वाद सुरुच आहेत. तर दुसरीकडे खासदार विशाल पाटलांच्या विधानामुळे मविआत देखील वादाची चिन्ह आहेत. तासगावातून मविआकडून रोहित पाटील उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र, विशाल पाटलांनी माजी मंत्री अजित घोरपडेंसोबत राहणार असल्याचं विधान केलंय. महायुतीमध्ये मागील काही दिवसांपासून श्रेयवाद आणि जागावाटपावरुन वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे महायुतीत सुरु असलेल्या या वादामुळे आगामी विधानसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.