Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोस्टरला काय जोडे मारता, हिंमत असेल तर समोर या, अजित दादांचे आव्हान
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारले. त्यावरुन अजित पवारांनी बारामतीतून या आव्हान दिलंय. पोस्टरला काय जोडे मारता, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान अजित पवारांनी दिलंय.
बारामतीच्या, जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरही निशाणा साधला. पोस्टरला जोडे मारता, धमक असेल जोडे घेवून समोर या मग पाहतो असं आव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंना दिलं. अजित पवारांची जनसन्मान यात्रा होम ग्राऊंड बारामतीत आली. दादांचं जल्लोषात स्वागत झालं. अजित पवार बारामतीत येत असल्यानं कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनरही लावले.
आतापर्यंत कोण कोण मुख्यमंत्री झाले त्यांच्या फोटोसह, 2024 मध्ये मुख्यमंत्री दादाच असं या बॅनरवर छापण्यात आलं. तर निवडणुकीनंतर अजित पवारच मुख्यमंत्री असतील, असं दादांचे सुपूत्र जय पवारही म्हणालेत. काही दिवसांआधी बारामतीतून जय पवारही उमेदवार असू शकतात असे संकेत दादांनीच दिले होते. मात्र उमेदवार दादाच असतील पण संधी मिळाली तर, लढणार असं जय पवार म्हणालेत. जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनाही टोले लगावत, दूधवालाही सकाळी लवकर उठतो, या वक्तव्यावरुन प्रत्युत्तर दिलं.
पाहा व्हिडीओ:-
लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवारांनी, जनसन्मान यात्रा सुरु केली. लोकसभेत सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर एवढं मोठं शक्तिप्रदर्शन पहिल्यांदाच बारामतीत झालंय.