टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : बंडानंतर अजित दादा पवारांशी काय बोलले? पाहा Video
बड पुकारल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन खलबतं झुरु झालीत. बंड आणि त्यानंतर शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली.
मुंबई : बंड पुकारल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन खलबतं झुरु झालीत. मात्र सिल्व्हर ओकवर झालेल्या या भेटीवरुन, दादांनीही प्रतिक्रिया दिलीय. बंड आणि त्यानंतर शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली.
तसं निमित्त, काकू प्रतिभा पवारांच्या तब्येतीचं होतं. प्रतिभा पवारांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर त्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आल्या आणि काकूंची विचारपूस करण्यासाठी अजित पवारही सिल्व्हर ओकवर आले. राजकारण वेगळं आणि कौटुंबिक नातं वेगळं अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. अजित पवार सिल्व्हर ओकवर आले, त्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळेही घरीच होत्या.
पाहा व्हिडीओ-
अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली जे शिवसेनेत झालं तसंच राष्ट्रवादीत झालंय. मात्र कौटुंबिक नातं जपण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आता पक्ष आणि चिन्हाचीही लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादीचे अध्यक्षही आपणच आहोत. पक्ष आणि चिन्हंही आपलंच आहे हेही अजित पवार सांगतायत.
दरम्यान, जेव्हा आगामी निवडणुकांमध्ये एबी फॉर्म देण्याची वेळ येईल, तेव्हा तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल.असं सांगून राष्ट्रवादीवर दादांनी पुन्हा एकदा दावा केलाय. पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात पोहोचलीय. अर्थात राजकीय रस्सीखेच सुरु असली तरी, नातं जपण्याचा प्रयत्न दादांनी केलाय.