Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विखेंमुळे निलेश लंके गेले, अजित दादांचे मोठे दावे, पाहा Video
विखेंच्या त्रासामुळेच निलेश लंके मविआत गेल्याचा मोठा दावा अजित पवारांनी केलाय. महायुतीतच लढणार असं सांगतानाच भाजपनं धाराशीवची जागा इच्छा नसताना लढायला लावली. आणि नगर-माढ्यात इच्छा असूनही तिकीट मिळालं नाही,असंही अजित पवारांनी म्हटलंय.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचे सर्व्हे येवू लागल्यानंतर अजित पवार गटानंही 288 जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवारांनी आपल्या नेत्यांसोबत औपचारिक गप्पा केल्या., आणि त्यात सध्या चर्चेत असलेल्या दैनिक सकाळच्या सर्व्हेवरही चर्चा झाली. सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळतील., यात काँग्रेसला 67, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 41 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 31 जागा तर महायुतीत भाजपला 95, शिंदेंच्या शिवसेनेला 27 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांना दोन मोठे दावेही केले., त्यानुसार जर भाजपनं नगर आणि माढाची जागा आम्हाला सोडली असती. तर निलेश लंके आणि धैर्यशील मोहिते आमच्याकडूनच निवडणूक लढवून विजयी झाले असते. मात्र भाजपच्या राधाकृष्ण विखेंनी त्रास दिल्यामुळेच निलेश लंके शरद पवारांकडे गेल्याचा दावाही अजित पवारांनी केला.
पाहा व्हिडीओ:-
अजितदादा म्हणाले की, नगर लोकसभा निलेश लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते. दक्षिण नगरमधून लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते निवडणूक लढणार होते पण भाजपनं दोन्ही जागा आम्हाला सोडल्या नाहीत. पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्यानं निलेश लंके मविआकडे गेले. लंकेंच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला गेला. विधानसभेसाठी अजित पवार गट 288 जागांचा सर्व्हे करणार आमच्या 54 जागा आहेतच, आणखीही जागा मागणार ,विधान परिषद निवडणुकीत आमदारांना कोणतीही प्रलोभनं दिली नाहीत.
माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना संधी देऊ. धाराशिवची जागा लढायची नव्हती, पण ती जागा आम्हाला घ्यायला लावली रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली त्यामुळे मतं ट्रान्स्फर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं असून आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती असेल, असा विश्वास अजित पवारांनी वर्तवलाय.