Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देवाभाऊ, योजना बंद होऊ होणार नाही, पाहा Video
लाडक्या बहिण योजनेविरोधात काँग्रेसचा व्यक्ती कोर्टात गेल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. तर याचिकाकर्त्याचा काँग्रेसशी कधीच संबंध न आल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय. काय आहे नेमका वाद आणि लाडकी बहिण योजनेवर फडणवीसांनी काय म्हटलंय. वाचा हा स्पेशल रिपोर्ट.
लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात कुणाचा माणूस गेला., यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद पेटलाय. मोफतच्या योजना बंद करुन मुलभूत प्रश्नांवर पैसा खर्च करावा. यासाठी नागपूरचे रहिवाशी अनिल वडपल्लीवारांनी हायकोर्टात याचिका केलीय. यावर फडणवीसांनी आरोप केलाय की वडपल्लीवार हे काँग्रेस समर्थक असून पटोले आणि सुनिल केदारांचे निकटवर्तीय आहेत. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्यानुसार वडपल्लीवारांचा काँग्रेसशी कोणत्याही पातळीवर संबंध नसून ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नाहीत.
एका माहितीनुसार अनिल वडपल्लीवार यांनी काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंसोबतही काही काळ काम केल्याची माहिती आहे. मात्र त्या सुलभा खोडके लवकरच अजित पवार गटात येणार असल्याचं खुद्द अजितदादांनीच सांगितलंय. विशेष म्हणजे सुलभा खोडकेंचे पती हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. साऱ्या आरोपांवर अनिल वडपल्लीवारांशीच आम्ही संपर्क केला. त्यावर आपण आयुष्यात कुणाचेही पीए राहिलेलो नसून लवकरच साऱ्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचं वडपल्लीवारांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री शिंदेंनी दावा केलाय की लाडक्या बहिणीविरोधात कोर्टात गेलेल्यांची याचिका कोर्टानं रद्द केलीय. मात्र दुसरीकडे आम्ही कोर्टात चांगला वकील देवून लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. दरम्यान लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमासाठी सरकारनं प्रत्येक बीडीओ अधिकाऱ्यांना २ हजार महिला जमवण्याचं टार्गेट दिलंय. इव्हेंटच्या माध्यमातून सरकारच्य तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.
आज लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची मत मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करत आहेत. गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व बीडीओ ला 2000 महिलांचा टारगेट देण्यात आलं आहे. योजना लोकप्रिय असत्या तर महिला स्वतःहून आल्या असत्या सरकारी तिजोरी जशी काही बाप जाण्याची मिळकत आहे असं वागत आहे. सामान्य माणसांचा पैसा स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वापराल का स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ५०-५० बसेस भरून आणण्याचे बिडीओला टार्गेट दिले.