Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : आत्रामांचं मुलीवर टीकास्त्र, पवार गटाचा पलटवार, पाहा Video

अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा केलीय. आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीवर टीका केलीय.दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात आलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : आत्रामांचं मुलीवर टीकास्त्र, पवार गटाचा पलटवार, पाहा Video
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 11:47 PM

अजितदादांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं आत्रामांवर टीकास्त्र डागलंय. भाग्यश्री आत्राम हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान धर्मरावबाबा आत्राम यांनी केलं होतं. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानतंर शरद पवार गटानं ट्विट करत धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह महायुतीवर शरसंधान साधलंय. स्वतःच्या लेकीला नदीत टाकणारे महाराष्ट्रातील लेकींची रक्षा करतील?

मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर मतभेदाची भूमिका पत्करणाऱ्या आपल्या लेकीला आपण नदीत टाकणार अशी धमकी देणारे महायुतीचे गुंड जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना न्याय आणि सुरक्षा कशी प्रदान करणार? महिलांच्या रक्षणाचे आणि सशक्तीकरणाचे आपणच नायक आहोत अशी खोटी दवंडी पिटणाऱ्या महायुती सरकारच्या महिलांप्रती असणाऱ्या निर्दयी व असंवेदनशील वृत्तीचा परिमाण म्हणजेच महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात आणि गुन्ह्यांत झालेली वाढ.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार? असं वक्तव्यही गडचिरोलीत धर्मरावबाबा आत्रामांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. भाग्यश्री आत्राम यांना सल्ला देत अजित पवारांनी पवार कुटुंबातील फुटीवरही वक्तव्य केलं होतं. घरात फूट पडू देऊ नका, माझ्याकडून चूक झाली होती अशी कबुली अजित पवारांनी दिली होती. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय.

धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर वडिलांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात बाप-लेकीमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.