टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : नरहरी झिरवाळांच्या एका वक्तव्याने शिंदेंच्या आमदारांना धडकी

| Updated on: Jul 11, 2023 | 3:33 PM

अजित पवारांच्या गटात असून सत्तेतही आलेत. मात्र सर्व बाजूंचा विचार केला तर शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असं भुवया उंचावणारं वक्तव्य झिरवाळांनी केलंय.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : नरहरी झिरवाळांच्या एका वक्तव्याने शिंदेंच्या आमदारांना धडकी
CM EKNATH SHINDE
Follow us on

मुंबई :  शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागणार आहेत. तर अजित पवारांच्या गटासोबत सत्तेत येऊन झिरवळांनी, आमदार अपात्र होणार असं वक्तव्य केलंय.

नरहरी झिरवाळांच्या एका वक्तव्यानं, शिंदेंच्या शिवसेनेच्या 16 आमदारांची धडकी नक्कीच भरली असेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असं झिरवाळ म्हणालेत. विशेष म्हणजे झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि आता ते अजित पवारांच्या गटात असून सत्तेतही आलेत. मात्र सर्व बाजूंचा विचार केला तर शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असं भुवया उंचावणारं वक्तव्य झिरवाळांनी केलंय.

 पाहा व्हिडीओ- 

झिरवाळांच्या वक्तव्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेनंही संताप व्यक्त केलाय. अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका, अशा शब्दात संजय शिरसाटांनी इशाराच दिलाय. तर मंत्री उदय सामंतांनी, प्रकरण राहुल नार्वेकरांकडे असून झिरवाळांनी सार्वजनिक बोलू नये असा सल्ला दिलाय.

शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाले तर मग सरकारच कोसळले…कारण 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आहेत आणि आधीच, अपात्रता लक्षात घेऊनच भाजपनं अजित पवार गटाला सोबत घेतल्याची टीका ठाकरे गटाकडून होतेय. त्यातच झिरवाळांच्या वक्तव्यानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. महाविकास आघाडीत असताना झिरवाळ, वारंवार आमदार अपात्रच होणार असं सांगत होते.

अपात्रतेंसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोटीस बजावल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं वेळ वाढवून मागितलीय.उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती करणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेनं स्पष्ट केलंय. हे झालं अपात्रतेसंदर्भात. तर खातेवाटप आणि उर्वरित विस्ताराकडेही लक्ष लागलंय.

मंत्रिमंडळाचा विस्तारही एक ते दोन दिवसांत होईल असं शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाटांनी सांगितलंय. स्वत: मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लवकरच हा शब्द प्रयोग केलाय. तर अजित पवार गट सत्तेत सहभागी होऊन 10 दिवस होत आहेत. मात्र अद्याप 9 मंत्र्यांचं खाते वाटप झालेलं नाही. मात्र अजित पवारांना अर्थ खातं मिळेल, असे संकेत उर्जा खात्याच्या एका जीआरमधून संकेत मिळालेत.

वीज दरात सवलत देण्याच्या जीआरवर नजर टाकली तर या जीआरवर 5 मंत्र्यांचा उल्लेख आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावापुढे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री असा उल्लेख आहे. फडणवीसांकडेच अर्थ खातंही आहे. मात्र त्यांच्या नावापुढे उर्जासह अर्थ खात्याचा उल्लेख न करता, स्वतंत्र कॉलम करुन माननीय उर्जा मंत्री अशी नोंद करण्यात आलीय. त्यामुळं हे खातं अजित पवारांना देण्यात येणार आहे का ? अशी चर्चा सुरु झाली.

जीआरमध्ये तिसरं नाव आहे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं चौथा नावं आहे उद्योगमंत्री उदय सामंतांचं आणि पाचवं नाव आहे सहकारमंत्री अतुल सावेंचं. अजित पवारांना अर्थ खातं देऊ नये, अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेची असल्याचं कळतंय आणि जीआरवरुन मंत्री उदय सामंतांच्या प्रतिक्रियेतून ते दिसतं सुद्धा. अर्थ खात्यावरुन अजित दादांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाला शह देण्यासाठी दादांना मुख्यमंत्री करण्यात येईल, अशी शंका रोहित पवारांना आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार 1 ते दोन दिवसांतच होईल असं मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिरसाटांनी म्हटलंय. संजय शिरसाट भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाचे मिळून 29 मंत्री आहेत आणि 14 खात्यांचा विस्तार बाकी आहे. त्यात कोणाचा नंबर लागतो हे दिसलेच.