Video : कर्नाटक प्रचारात राज्यातील नेतेच भिडले, ‘फडणवीस फौजदावरुन हवालदार’ तर ‘राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष’!
प्रचार कर्नाटकातल्या सीमा भागातील निवडणुकीचा होता पण आपलेच नेते सीमाभागात आमनेसामने आले. निपाणी मध्ये प्रचार करताना फडणवीसांनी, राष्ट्रवादीला साडे 3 जिल्ह्यांचा पक्ष म्हटलं.
मुंबई : कर्नाटक निवडणुकीचा प्रचार थांबलाय. 10 तारखेला कर्नाटकची जनता, आपला फैसला देणार आहे. तर सीमाभागातल्या प्रचारात फडणवीस आणि शरद पवार आमनेसामने आलेत. प्रचार कर्नाटकातल्या सीमा भागातील निवडणुकीचा होता पण आपलेच नेते सीमाभागात आमनेसामने आले. निपाणी मध्ये प्रचार करताना फडणवीसांनी, राष्ट्रवादीला साडे 3 जिल्ह्यांचा पक्ष म्हटलं.
कोण पार्सल आहे आणि कोण किती वस्ताद आहे हे, निपाणीतल्या सभेत बोलणार असं पवार म्हणाले,अर्थात पवारांची निपाणीत सभा झाली पण साडे 3 जिल्ह्याच्या फडणवीसांच्या टीकेवर पवार काही बोलले नाही. पण निपाणीला रवाना होण्याआधी पवार काय म्हणाले होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फडणवीसांवर बोलले. भाजपनंच, फडणवीसांना फौजदावरुन हवालदार केल्याची टीका जयंत पाटलांनी केली. कर्नाटकमध्ये, राष्ट्रवादीनं 9 उमेदवार उभे केलेत. निपाणीत उत्तमराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पवारांनी सभा घेतली आणि भाजपला खड्यासारखं बाजूला करण्याचं आवाहन केलं. कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान होतेय. 10 तारखेला मतदान आणि 13 तारेखला निकाल लागणार आहे.
कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असली तरी कुमारस्वामींच्या जेडीएसकडे लक्ष लागलंय. भाजपकडून मोदींनीही धुवांधार प्रचार केलाय. त्यामुळं कर्नाटकात पुन्हा भाजप की काँग्रेस, याचा निर्णय 10 तारखेला ईव्हीएममध्ये बंद होईल.